इराण आणि अमेरिका संघर्षाने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. या संघर्षाच्या झळा संपूर्ण जगाला सोसाव्या लागत आहेत. युद्ध जर अजून काही काळ चालले तर त्याचे वाईट परिणाम जगाला भोगावे लागतील. इराण आणि अमेरिका युद्धात होर्मुज खाडी बंद आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने ऊर्जेचे संकट आहे. एलपीजी गॅस आणि कच्च्या तेलाचा महत्वपूर्ण मार्ग होर्मुज खाडी आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने जगातील अनेक देश संकटात आहेत. याचदरम्यान आता एक दिलासा देणारी वार्ता समोर आली आहे
समोर आलेल्या माहितीनुसार , होर्मुज खाडीत पुन्हा एकदा जहाजांची ये-जा दिसतंय. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्स (आयआरजीसी) नौदलाने सांगितले की, 24 तासात तेलवाहू जहाजे आणि कंटेनर जहाजांसह 26 व्यापारी जहाजांना जलमार्गातून जाण्याची परवानगी दिली. गेल्या काही दिवसांपासून होर्मुज खाडी बंद आहे. जहाज होर्मुज खाडी पार करण्याकरिता प्रतिक्षेत होती. तब्बल इतक्या दिवसांनंतर होर्मुज खाडीतून जहाजांची ये-जा सुरू झाली. होर्मुज खाडी पार करण्याचा प्रयत्न करत असलेल्या अनेक जहाजांवर हल्ला करण्यात आला.
फक्त इराणच नाही तर होर्मुज खाडीच्या बाहेर अमेरिकेचाही मोठा पारा आहे. अमेरिकेनेही नाकेबंदी केली. होर्मुज खाडी जगातील महत्वपूर्ण मार्गांपैकी एक आहे. होर्मुज खाडी 13 आठवड्यांपासून ठप्प होती. एखाद दुसरे जहाज होर्मुज खाडीतून जात होते. त्यामध्येच आता 24 तासात तब्बल 26 जहाजांनी होर्मुज खाडी पार केली म्हणजे ही जगाकरिता दिलासादायक बातमी आहे.
होर्मुज खाडी बंद आणि इराण अमेरिका युद्ध. यात जागतिक बाजारात सतत तेलाच्या भावात मोठी वाढ झाली. तेलाचे भाव सतत वाढत असल्याने जगाच्या जवळपास देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. भारतातही मोठा तुटवडा निर्माण झाला. भारत कोणत्याही पद्धतीने भारतात अधिका अधिक कच्चे तेल कसे आणले जाईल, याचा प्रयत्न करत आहे. दिवसेंदिवस कच्च्या तेलाचा साठा कमी होत आहे.