आजकाल गुन्हेगारीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असून अतिशय शुल्लक अशा कारणांवरून अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे सरार्सपणे घडत आहते. दरम्यान आता अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे.
जळगाव शहरातील शाहूनगर भागात एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. केवळ खाण्यासाठी मागितलेली 'खिचडी' दिली नाही, याच एका क्षुल्लक कारणाचा राग मनात धरून एका विकृत प्रवृत्तीच्या नराधमाने 40 वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात सिमेंट काँक्रीटचा मोठा दगड घालून त्याचा निघृण खून केल्याची थरारक घटना घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली व्यक्ती जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, मयत जीवन शालिक पाथरकर हे 8 जून 2026 रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील शाहूनगर येथील एका मोकळ्या जागेत हजर होते. याच वेळी त्या ठिकाणी गावातीलच संशयित आरोपी अंकुश नथ्थू पाटीलहा आला. संशयित अंकुश याने जीवन पाथरकर यांच्याकडे खाण्यासाठी खिचडी मागितली.
मात्र, जीवन यांनी त्याला खिचडी देण्यास नकार दिला. आपल्याला खिचडी खाण्यास दिली नाही, या गोष्टीचे संशयित अंकुशला प्रचंड वाईट वाटले आणि त्याचा राग अनावर झाला. याच रागाच्या भरात त्याने बाजूला पडलेला सिमेंट काँक्रीटचा जड दगड उचलला आणि थेट जीवन यांच्या डोक्यात घातला. हा वार इतका भीषण होता की, गंभीर दुखापत होऊन जीवन यांचा जागीच मृत्यू झाला.