मागील काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या जंतर मंतर येथे cjp कडून मोठे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता. तसेच, या आंदोलनदरम्यान मोठा गदारोळ निर्माण झाला होता तसेच, या आंदोलनात पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याचेही समोर आले. दरम्यान आता या आंदोलाबाबत एका धक्कादायक खुलासा झाला आहे.
मात्र आता या आंदोलनाचा वापर करून दहशतवादी भारतात मोठ्या हल्ल्याची तयारी करत असल्याचे उघड झाले आहे. दहशतवाद्यांनी रचलेला कट उधळण्यात तपास यंत्रणेला यश आले. पंजाबमध्ये २ दहशतवादी मॉड्यूल पकडण्यात आले. त्यांच्याकडून पेट्रोल बॉम्ब, पिस्तुल आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहे.
पंजाब पोलिसांनी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI च्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या २ दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. ज्यात ४ अल्पवयीन मुलांसह ९ लोकांना अटक करण्यात आली. या आरोपींचा कट दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावेळी मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा होता असा दावा पोलिसांनी केला आहे.
८ साथीदारांसोबत दिल्लीला पोहचले होते आरोपी तपासात एका आरोपीने खुलासा केला की, तो त्याच्या ८ साथीदारांसह दिल्लीत पोहचला होता. तिथे पाकिस्तानी हँडलरच्या सांगण्यावरून उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीसोबत त्याची ओळख झाली. या व्यक्तीला शस्त्रे आणि स्फोटके उपलब्ध करण्याचं काम होते. परंतु जंतर मंतरवर असणाऱ्या कठोर सुरक्षा व्यवस्थेमुळे हा कट फसला आणि सर्व पुन्हा माघारी परतले. पंजाब पोलिसांनी जे दहशतवाद्याचे २ मॉड्यूल पकडले आहेत त्यातील पहिला मॉड्यूल राजाझांसी परिसरात पकडण्यात आले. ज्यात सुखमन सिंग आणि ३ अल्पवयीन सहकाऱ्याचा समावेश होता. त्यांच्याकडून ४ पेट्रोल बॉम्ब, २ पिस्तुल आणि ९ जिवंत काडतुसे आणि लायटर जप्त करण्यात आले. जंतर मंतरवरील सुरक्षेमुळे डाव फसला चौकशीत सुखमन सिंग यांनी कबूल केले की, पाकिस्तानात बसलेल्या ISI हँडलरच्या तो संपर्कात होता. त्याला दिल्लीतील जंतर मंतर येथे हल्ला करण्याचा टास्क दिला होता.
तो त्याच्या साथीदारांसह दिल्लीत पोहचला होता परंतु सुरक्षा यंत्रणेच्या सतकर्तमुळे हल्ला करू शकला नाही. आरोपींना पंजाब पोलीस भवनाची रेकी करण्याचं काम दिले होते. दुसऱ्या मॉड्यूलने रेल्वे ट्रॅकजवळ गुप्त कॅमेरे लावून रेल्वेची वाहतूक आणि त्याच्या वेळेची नोंद घेतली होती. हे फुटेज पाकिस्तानात बसलेल्या हँडलरला पोहचले जात होते. रेल्वे पोलवर पोलिसांना संशयित कॅमेरा सापडला. पकडलेले अल्पवयीन आरोपी हे गरीब कुटुंबातून आले आहे आणि त्यांनी शिक्षण अर्धवट सोडले आहे. पैशांचे आमिष दाखवून त्यांना देशविरोधी कृत्यात सहभागी करून घेतले. त्यांना काचेच्या बाटलीत पेट्रोल बॉम्ब बनवण्याचे ट्रेनिंग दिले होते.