माणसाला मृत्यू कुठे कधी आणि कसा गाठेल याचा काही नेम नसतो. याची प्रचिती एक अत्यंत मन हेलावणाऱ्या घटनेवरून येत आहे. खेळ सुरु असतानाच एका खळाडुच्या अंगावर वीज कोसळली आणि क्षणातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा विडिओ अत्यंत वेगाने व्हायरल झाला आहे.
वीज पडून एका 24 वर्षीय खेळाडूचा मृत्यू झाला. ही घटना दक्षिण थायलंडमध्ये घडली, जिथे एका स्थानिक सामन्यादरम्यान फुटबॉलपटू सोफवान अवे याचा मृत्यू झाला. या घटनेत जवळपास डझनभर इतर खेळाडूही जखमी झाले. व्हिडिओमध्ये मुसळधार पावसात सुरू असलेला फुटबॉल सामना दिसत आहे. अचानक, सोफवानवर वीज कोसळली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. तो खेळाडू जमिनीवर कोसळला आणि त्याला हालचाल करता येत नव्हती. संघातील बाकीचे खेळाडू त्वरीत त्याच्या मदतीला धावले. ‘द इंडिपेंडंट’च्या वृत्तानुसार, गंभीर दुखापतींमुळे सोफवानचा मृत्यू झाला. ही स्थानिक स्पर्धा एफए कप असल्याचे सांगण्यात आले. या स्पर्धेत हौशी आणि थाई-मलेशियन संघही सहभागी होतात. सोफवान या स्पर्धेत सॅमकोल्ट्स संघाकडून खेळत होता.
टीसीएस प्रकरण : 'एमआयएम' नगरसेवक मतीन पटेलची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, मुसळधार पावसामुळे सामना थांबवायला हवा होता का, ज्यामुळे ही घटना टाळता आली असती, असा प्रश्न लोकांनी उपस्थित केला आहे. त्यांनी आयोजकांच्या जबाबदारीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मलेशियन वृत्तसंस्था बर्नामाच्या वृत्तानुसार, पोलीस प्रमुख थुन सिरिखुंट म्हणाले, “आपत्कालीन वैद्यकीय पथकाने त्याला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु या घटनेत झालेल्या गंभीर जखमांमुळे पीडित व्यक्तीचा मृत्यू झाला.”
राज्य सरकारचा मोठा निर्णय ! ''या'' 114 प्रकाशनांवर बंदी
वीज थेट सफवानवर पडली आणि तो क्षणार्धात जमिनीवर कोसळला. स्टेडियममध्ये एकच गोंधळ उडाला. सफवानला वाचवण्यासाठी प्रेक्षक आणि इतर उपस्थित लोक घाबरून मैदानाकडे धावले. तातडीने वैद्यकीय पथकाला बोलावण्यात आले आणि सफवानला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही त्याला वाचवता आले नाही आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
वृत्तानुसार, थायलंडमध्ये वीज पडून होणारे मृत्यू सामान्य आहेत, तरीही सामना थांबवण्यात आला नाही. रोग नियंत्रण विभागाच्या आकडेवारीनुसार, 2020 ते 2024 दरम्यान वीज पडून 283 लोकांचा मृत्यू झाला. ही आकडेवारी असूनही, सामना थांबवण्यात आला नाही, ही खरोखरच एक दुःखद बाब आहे.