गर्लफ्रेंडबाबत ChatGPT ला विचारलं असं काही की थेट पोलीसच आले  घरी; नेमकं घडलं काय?
गर्लफ्रेंडबाबत ChatGPT ला विचारलं असं काही की थेट पोलीसच आले घरी; नेमकं घडलं काय?
img
Nandini khandare More
सध्या चॅटजीपीटी एआय टूलचा वापर आता लहानाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण वापर करतात. कारण  ChatGPT मुळे क्षणातच जगभरातील कोणतीही माहितीआपल्याला मिळते . पण आता चॅटजीपीटीला असाच एक प्रश्न विचारणं अमेरिकेमधील फ्लोरिडामध्ये राहणाऱ्या तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. तसेच चौकशी करण्यासाठी पोलीस त्याच्या घरी पोहोचले.

या तरुणाने एक गुन्हा करण्यासाठी चॅटजीपीटीकडे मार्गदर्शन आणि सविस्तर योजना मागितली होती. मला माझ्या एक्स गर्लफ्रेंडवर बलात्कार करून तिची हत्या करायची आहे, असे या तरुणाने विचारले होते. मात्र चॅटजीपीटीच्या सिस्टिमने प्रसंगावधान राखत याची माहिती अमेरिकेच्या एफबीआय या तपास यंत्रणेला दिली. या प्रकरणाची सुरुवात ओपनएआयच्या डिटेक्शन सिस्टिममधून झाली होती. सिस्टिमने एक डिस्टर्बिंग मेसेज आल्याचे डिटेक्ट केले. हा मेसेज एका २५ वर्षांच्या तरुणाने केला होता.

त्यानंतर एफबीआयने या तरुणाची मागच्या दोन महिन्यातील चॅट हिस्ट्री मिळवली. तेव्हा तपासामद्ये त्याने चॅटजीपीटीचा वापर मार्च महिन्यात सुरू केल्याचे समोर आले. तसेच त्याचं गर्लफ्रेंडसोबतचं सहा महिन्यांचं नातं संपुष्टात आल्यानंतर हा तरुण ब्रेकअपसंदर्भात प्रश्न चॅटजीपीटीला विचारायचा मात्र पुढे त्याच्याकडून विचारण्यात येत असलेले प्रश्न गंभीर बनत गेले. त्यानंतर तपास यंत्रणांनी त्याचं घर गाठून त्याची चौकशी केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group