१८ मे २०२६
मनमाड (नैवेद्या बिदरी) :- शहरातील मध्यवर्ती भाग म्हणून ओळख असलेल्या आठवडे बाजार परिसरातील ईदगाह पुलाजवळ रात्रीच्या सुमारास तरुणाची एका टोळक्याने धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केल्याने शहरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने तपासाची चके्र फिरवत संशयितांना ताब्यात घेतल्याचे समजते.याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील ईदगाह पुलाजवळ रात्रीच्या सुमारास सुदर्शन सुरज चव्हाण या तरुणाची एका टोळक्याने धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. त्याच्या मानेवर आणि चेहर्यावर मोठे वार केल्याने रक्तस्त्राव जास्तप्रमाणात झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर मृत तरुणाचा मृतदेह शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त देखील परिसरात आणि रुग्णालया बाहेर तैनात करण्यात आला आहे. सदरील मृत तरुण सुदर्शन चव्हाण हा मुंबई येथे राहत असून त्याचा साखरपुडा दोन दिवसांपूर्वीच झाल्याचे समजते.
Copyright ©2026 Bhramar