११ मे २०२६
बीड मधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. थेट केबिनमध्ये जाऊन ख्याधिकाऱ्याच्या जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची घटना उघडकीस आली आहे. बीड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना त्यांच्या दालनामध्ये जाऊन शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना यासमोर आली आहे.
या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी नगरपालिकेसमोर आंदोलन देखील केले.बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे हे आपल्या दालनात बसलेले असताना, त्या ठिकाणी आलेल्या एका व्यक्तीने पी टी आर ची नोंदणी घेण्याच्या मागणीसाठी अरेरावीची भाषा वापरली. तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देखील दिली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. दरम्यान या प्रकरणात आता मुख्याधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे अधिकारी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत का? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. तर शुल्लक कारणावरून थेट जीवे मारण्याची धमकी देण्यापर्यंत नागरिकांची मजल जात असेल तर कायद्याचे राज्य आहे का? असा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे.
Copyright ©2026 Bhramar