अंधश्रद्धा, जादूटोणा आणि भूतबाधा दूर करण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक होत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. दरम्यान आता अशीच एक घटना उघडकीस आली आहे. एक प्रकरण समोर आलं आहे. ज्यात दिराने भूतबाधा काढण्याच्या नावाखाली स्वतःच्या वाहिनीवरच वासना शमवून घेतली. हे मध्य प्रदेश भोपाळमधील प्रकरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , आरोपी मांत्रिकाने आधी गुप्त शाप लागल्याचं सांगून कुटुंबाला घाबरवलं. भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली या मांत्रिकाने स्वत:च्या वहिनीवर अत्याचार केले. सिविल लाइन पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. या प्रकरणात आरोपी मांत्रिक पेशाने मॅकेनिक आहे. पण, तो भूतबाधा उतरवण्याचे दावे करुन तांत्रिकाचही काम करतो. त्याने अलीकडेच भावाला सांगितलं की, तुझ्या कुटुंबावर कोणीतरी काळी जादू केली आहे. त्यानंतर भावाच्या कुटुंबाने शापातून मुक्तीसाठी उपाय सुचवण्याची विनंती केली.
आरोपी सोमवारी रात्री तंत्र-मंत्राचे विधी करण्यासाठी भावाच्या घरी आला. दारु, अंडी, नारळ अशा वस्तुंची त्याने व्यवस्था करायला सांगितली होती. सुरुवातीला त्याने त्याच्या भावावर काही विधी केले. त्याने त्याला खोलीतून निघून जायला सांगितलं. आरोपीने भावाला सांगितलं की, तुझ्या पत्नीवर सफाईचे काही विधी केल्याशिवाय काळीजादू, भूतबाधेतून मुक्ती मिळणार नाही. तपास अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
भावाची पत्नी खोलीत येताच त्याने दरवाजाला आतून कडी लावून घेतली. आरोपीने तिच्या कपाळावर गुंगी आणणारं काहीतरी लावलं. हळूहळू महिलेची शुद्धा हरपत गेली. त्या स्थितीचा फायदा उचलून आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो तिथून निघून गेला. त्याने कुटुंबाला आश्वसत केलं की, तुमच्या कुटुंबावरची काळी सावली आता निघून गेली आहे. भाऊ आतमध्ये गेल्यानंतर पत्नी बेशुद्धावस्थेत होती. पत्नीला शुद्ध आल्यानंतर तिने तिच्यासोबत काय घडलं ते सांगितलं.त्यानंतर आरोपीविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला.