धक्कादायक! रात्री दुचाकीने परतणाऱ्या तरुण-तरुणी सोबत 7 जणांचं धक्कादायक कृत्य,नेमकं काय  घडलं  ?
धक्कादायक! रात्री दुचाकीने परतणाऱ्या तरुण-तरुणी सोबत 7 जणांचं धक्कादायक कृत्य,नेमकं काय घडलं ?
img
Nandini khandare More
 

आजकाल गुन्हेगारीच्या प्रमाणात चिंताजनक वाढ झाली असून स्त्रियांचा विनयभंग अत्याचार, दादागिरी हाणामाऱ्या अशा अनेक घटना सर्रास पणे  घडत आहेत दरम्यान आता अशीच एक घटना आता उघडकीस आली आहे. 

कोल्हापूर इचलकरंजी शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं रात्री दुचाकीने मैत्रिणीसोबत जाणाऱ्या एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी तरुणासोबत असलेल्या युवतीचा देखील विनयभंग केला आहे. या प्रकरणी सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सात जणांनी अशाप्रकारे तरुण तरुणीसोबत कृत्य केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मारहाण झालेल्या पीडित तरुणाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुण हा आपल्या मित्र आणि मैत्रिणींसोबत पंचगंगा नदीवरील 'गंगा महाआरती'चा कार्यक्रम संपवून मोटारसायकलवरून घरी परतत होता. त्यांची दुचाकी छत्रपती संभाजी चौक परिसरात आली असता, दबा धरून बसलेल्या संशयित आरोपींनी त्यांना रस्त्यातच अडवलं.

संशयितांनी जुन्या वादातून फिर्यादी तरुणाला अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्याने आरोपींनी तरुणाला लाथाबुक्क्यांनी आणि दगडधोंड्यांनी मारहाण केली. या गोंधळादरम्यान, तरुणासोबत असलेल्या एका तरुणीचा आरोपींनी विनयभंग केला. तसेच, तिथे उपस्थित असलेल्या दुसऱ्या एका तरुणीला या प्रकरणात पडल्यास 'जीवे मारू' अशी थेट धमकी आरोपींनी दिली, असं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे.

पीडित तरुणाच्या तक्रारीनंतर शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने पावले उचलत एकूण ७ जणांवर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पृथ्वीराज चव्हाण, संमद सनदी, अमन राजकुमार धिमान, उमेश, प्रवीण आणि अन्य दोन अनोळखी व्यक्ती अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत. सर्व आरोपी फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group