२५ मे २०२६
नाशिक :- आज बारा बंगला जवळील सिदार्थ नगर झोपडपट्टी परीसर येथे ९०० मीमी. व्यासाची निलगिरी बाग जलशुध्दीकरण केंद्रास रॉ वॉटर पाईपलाईन अचानक नादुरुस्त झाल्याने तातडीची बाब म्हणुन या ठिकाणी पाईपलाईन दुरुस्तीचे काम करणे आवश्यक आहे.
या दुरुस्तीचे काम हे उद्या दि. २६/०५/२०२६ रोजी सुरु करण्यात येणार असल्याने असल्याने मंगळवार दि. २६/०५/२०२६ रोजी पंचवटी व नाशिक पुर्व विभागातील खालील भागातील सकाळचा पाणी पुरवठा हा कमी दाबाने होणार आहे व संध्याकाळचा पाणी पुरवठा होणार नाही.
तसेच बुधवार दि.२७/०५/२०२६ रोजीचा सकाळचा पाणी पुरवठा देखील कमी दाबाने होईल याची सदर परीसरातील नागरीकांनी याची नोंद घ्यावी मनपास सहकार्य करावे असे आवाहन मनपा तर्फे करण्यात आले आहे.
*पंचवटी*
प्रभाग नं. १ रामेश्वर नगर व निसर्ग नगर परीसर व इतर कमी दाबाने
प्रभाग नं २ सपुर्ण धात्रक फाटा, निशांत व्हीलेज महालक्ष्मी नगर, शरयु पार्क, आडगांव म्हसरुळ लिंक रोड, मेडीकल फाटा परीसर, आडगांव गावठाण, आडगाव मळे परीसर, कोणार्क नगर, नांदुर जत्रा रोड परीसर, समर्थ नगर, निलगीरीबाग परीसर, हनुमान नगर परीसर, नांदुरनाका परीसर, संभाजी नगर परिसर नांदुर मानुर परीसर व इतर
प्रभाग ३
लुंगे मंगल कार्यालय परीसर, आडगांव नाका परीसर, चव्हाण मळा परीसर, गणेशवाडी, जनार्दन नगर परीसर, विजय नगर, साईनगर, माने नगर कळसकर नगर, अमृत धाम व गोपाळ नगर, सरस्वती नगर परीसर तपोवन व इतर परीसर
*नाशिक पुर्व*
प्रभाग नं. १५ काठे गल्ली माननगर, शंकर नगर, टाकळी रोड, व्दारका परीसर, गोडेबाबा नगर परीसर समर्थ नगर मारुती वेफर्स तिग्रानिया रोड प्रज्ञा सोसायटी कॉलनी व इतर परीसर.
Copyright ©2026 Bhramar