पंचवटीत हिरावाडी रोडवर ज्वेलर्सच्या दुकानावर दरोड्याचा प्रयत्न
पंचवटीत हिरावाडी रोडवर ज्वेलर्सच्या दुकानावर दरोड्याचा प्रयत्न
img
चंद्रशेखर गोसावी
\
नाशिक - शहरातील पंचवटी परिसरामध्ये असलेल्या हिरावाडीरोड येथे समृद्धी ज्वेलर्स या ठिकाणी ६ दरोडेखोरांनी दरोडा घालण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. 



या सर्व प्रकरणाबाबत प्रथमदर्शनी मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पंचवटी परिसरामध्ये असलेल्या हिरावाडी रोडवर समृद्धी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे.
या ठिकाणी दुकान चालक हे साडेआठ नऊ वाजेच्या दरम्यान दुकान बंद करण्याच्या तयारीत असताना अचानक ६ जण आले आणि त्यांनी या ठिकाणी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुकानदाराने त्यांना विरोध केला असता त्यांच्या झटापट झाली. या झटापटीत दुकानदार जखमी झाला आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने पंचवटी पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group