नाशिकमध्ये
नाशिकमध्ये "या" परिसरातील वीज पुरवठा उद्या बंद राहणार
img
Nandini khandare More
नाशिक : महापारेषण कंपनीच्या १३२ केव्ही टाकळी उपकेंद्राच्या देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने नाशिक शहर विभाग २ च्या द्वारका उपविभाग अंतर्गत असलेल्या  ग्राहकांचा वीज पुरवठा (शनिवारी) २३ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी ११ वाजेपर्यंत विद्युत पुरवठा बंद  राहणार आहे.  यामध्ये खालील परिसराचा समावेश असेल.

उत्तरा नगर, शंकर नगर, काठे गल्ली, पखाल रोड, सारडा सर्कल परिसर, तपोवन रोड, टाकळी रोड, टाकळी गाव आणि  अशोका मार्ग व परिसर. 
देखभाल व दुरुस्तीचे काम नियोजित वेळेअगोदर पूर्ण झाल्यास वीज पुरवठा तत्काळ सुरू करण्यात येईल. तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या शहर विभाग २ कडून करण्यात आले आहे.
इतर बातम्या
उद्या

गंगापूर धरण

Join Whatsapp Group