आंतरजातीय विवाह केलेल्या तरुणीवर अमानुष अत्याचार ! 8 वेळा गर्भपात; नाशिकमधील घटना
आंतरजातीय विवाह केलेल्या तरुणीवर अमानुष अत्याचार ! 8 वेळा गर्भपात; नाशिकमधील घटना
img
Nandini khandare More



महिलांवर होणारे कौटुंबिक अत्याचाराच्या अनेक घटना घडत असून आता अशीच एक धक्कादायक बातमी नाशिकमधून समोर येत आहे. विशेष म्हणजे या तरुणीने प्रेमवीवाह केला असून ती आंतरजातीय आहे म्हणून तिचा छळ केला गेला असल्याची संतापजनक घटना घडली आहे. 

तू आमच्या जातीची नाहीस, असे म्हणत तिचा सासरच्या मंडळींनी छळ तर केलाच, पण त्याहूनही भयंकर म्हणजे या विवाहितेचा तब्बल ८ वेळा गर्भपात घडवून आणल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात पती, सासू आणि सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा प्रेमविवाह झाला होता. लग्न झाल्यानंतर सुरुवातीला सर्व काही सुरळीत वाटत होते. असे असतानाच तिच्या सासूने “तू आमच्या जातीची नाहीस, तुझ्या मुलांना आम्ही स्वीकारणार नाही,” असे टोमणे मारण्यास सुरुवात केली. यानंतर सासूकडून विवाहितेवर गर्भपातासाठी दबाव आणण्यात गेला. यानंतर सासरच्या लोकांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. या अमानुष छळादरम्यान सासरच्यांनी विवाहितेची इच्छा नसतानाही तिचा तब्बल ८ वेळा गर्भपात घडवून आणला, असे तक्रारीत म्हटले आहे.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, सासू आणि सासऱ्यांनी तिला वारंवार शिवीगाळ करत मानसिक छळ केला. हा अत्याचार एवढ्यावरच थांबला नाही, तर तुला वेडी ठरवून मेंटल हॉस्पिटलला ॲडमिट करू, अशी धमकीही तिला सातत्याने देण्यात आली. पीडित महिला आणि तिचा पती सुरुवातीला पुण्यात नोकरी निमित्त राहत होते. मात्र, पुढाकार घेऊन नोकरी गेल्यानंतर जुलै २०२५ मध्ये ही महिला नाशिकला परतली. नाशिकमध्ये आल्यानंतर तिच्यावरील छळाचे प्रमाण अधिकच वाढले.

शारीरिक आणि मानसिक छळासोबतच विवाहितेची आर्थिक फसवणूकही करण्यात आली. नाशिकमध्ये स्वतःचे घर खरेदी करायचे आहे, असे सांगून पतीने विवाहितेचे सोन्या-चांदीचे दागिने मोडून पैसे हडप केले. याशिवाय माहेरून आणखी पैसे आणि हुंडा आण यासाठी सतत तिच्यावर सतत दबाव टाकला जात होता. केवळ जात वेगळी असल्याच्या कारणावरून तिला घरात सन्मानाने जगू दिले जात नव्हते.

या सासरच्या जाचाला कंटाळून अखेर पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतली.  पती सासू आणि सासरे या तिघांविरोधात तक्रार दाखल केली आहे.  दरम्यान , तक्रारीवरून म्हसरूळ पोलिसांनी  संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group