नाशिक : कॉलेज रोडला फ्लॅटचे लॅचलॉक तोडून आठ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास
नाशिक : कॉलेज रोडला फ्लॅटचे लॅचलॉक तोडून आठ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचे लॅचलॉक कशाच्या तरी सहाय्याने तोडून अज्ञात चोरट्याने घरातील बेडरूममध्ये कपाटात ठेवलेले आठ तोळ्यांचे सोन्याचे दागिने व चांदीचे जोडवे असा सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना कॉलेज रोड येथे घडली.



याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अमोल एकनाथ वावीकर (रा. स्टेट बँक एम्प्लॉईज वैभव सोसायटी, कॉलेज रोड, नाशिक) हे पत्नीसह दि. 14 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास गंगापूर रोडवरील शंकराचार्य न्यास येथे प्रवचन ऐकण्यासाठी गेले होते. ही संधी साधून कोणी तरी अनोळखी इसमाने त्यांच्या फ्लॅटच्या मुख्य लाकडी दरवाजाचे लॅचलॉक कशाच्या तरी सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला. 

त्यानंतर घरातील बेडरूममध्ये असलेले लाकडी व लोखंडी कपाट उघडून त्यातील लॉकरमध्ये ठेवलेले एक लाख रुपये किमतीचे पाच तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र, 30 हजार रुपये किमतीची 15 ग्रॅमची सोन्याची माळ, 10 हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅमचे सोन्याचे कर्णफूल, दहा हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅमचे कानातील टॉप्स, चार हजार रुपये किमतीची दोन ग्रॅमची सोन्याची नथ व एक हजार रुपये किमतीचे सहा ग्रॅम वजनाचे चांदीचे जोडवे असा एकूण 1 लाख 89 हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने घरफोडी करून चोरून नेला. 

या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group