Nashik Crime : अघोरी प्रथा अन... एरंडेच्या कार्यालयातून पक्ष्यांचे अवयव, सापाची कात, कवडी जप्त
Nashik Crime : अघोरी प्रथा अन... एरंडेच्या कार्यालयातून पक्ष्यांचे अवयव, सापाची कात, कवडी जप्त
img
वैष्णवी सांगळे
नाशिक शहरातील उच्चभ्रू वर्तुळात वावरणाऱ्या ६३ वर्षीय रवींद्र एरंडे याचे कारनामे अशोक खरातप्रमाणे असल्याचे समोर येत आहे. दोन्ही संतापजनक घटनेतील 'बाप' कोण अशी चर्चा नाशिककरांमध्ये रंगल्याच चित्र आहे. कारण अशोक खरात प्रमाणेच रवींद्र एरंडेचे देखील धक्कादायक आक्षेपार्ह व्हिडीओ समोर येत आहे. आणि अघोरी प्रकार देखील करत असल्याचा संशय बळावला आहे. 

पोलिसांनी रवींद्र एरंडेच्या कार्यालयातून सापाची कात, पक्ष्यांचे अवयव, कवडी हे साधे साहित्य नसून, त्यामागे एक मोठे ब्लॅकमेलिंग रॅकेट असल्याचे तपासात समोर येत आहे.  केवळ लैंगिक शोषणच नव्हे, तर अशोक खरातप्रमाणेच अघोरी प्रथा, जादूटोणा आणि वशीकरणाच्या बळावर महिलांना जाळ्यात ओढण्याचा संशय आता बळावला आहे. सध्या एरंडे पोलीस कोडठीत आहे. 

पोलीस कोठडीत वाढ झाल्यानंतर आता तपासाची दिशा एरंडेच्या अघोरी कनेक्शनकडे वळली आहे. ऑफिसबॉयने केलेल्या भांडाफोडीनंतर आता एकापाठोपाठ एक ७ पीडित महिलांनी हिंमत दाखवत थेट फिर्याद देणे आवश्यक ठरणार आहे. आक्षेपार्ह व्हिडिओवरून चौघांनी खंडणी उकळल्याचे सांगत स्वतःचे पाप लपविणाऱ्या पत्रकार एरंडे याच्या लैंगिक अत्याचाराचे बिंग अखेरीस त्याच्याच ‘ऑफिस बॉय’ने रचलेल्या सापळ्यामुळे फुटले.

दोन दिवसांची पोलिस कोठडी संपल्याने त्याला सोमवारी (दि. ६) पुन्हा नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी तपास अधिकारी सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सचिन बारी यांनी न्यायालयात तपासाचे मुद्दे स्पष्ट केले. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता भानुप्रिया पेठकर यांनी सरकारी पक्षातर्फे न्यायालयात युक्तिवाद केला. त्यानुसार न्यायालयाने एरंडे याच्या पोलिस कोठडीत १० एप्रिलपर्यंत वाढ केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group