नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) - नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे २५ एप्रिल ते १ मे दरम्यान फ्रावशी इंटरनॅशनल अकॅडमी प्रेझेंट्स NWPL आयोजित करण्यात आले आहे.
आयकॉन खेळाडू लिलावप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे व सुनंदा पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी खेळाडुंमध्ये पल्लवी बोडकेला सर्वाधिक २८००० गुणांच्या बोलीचा मान मिळाला. या यष्टीरक्षक फलंदाज खेळाडूस , बालाजी सुपर नोव्हाजने आपल्या संघात घेतले.
त्यानंतर नाशिक महिला प्रीमियर लीगचे चषक अनावरण दिमाखदार सोहळ्यात करण्यात आले. सोबतच पाचही संघांच्या जर्सीज देखील प्रदर्शित करण्यात आल्या. या चषक अनावरण प्रसंगी मंचावर स्पर्धेचे प्रमुख प्रायोजक फ्रावशी इंटरनॅशनल अकॅडमीचे रतन लथ , मेघना लथ, आदिवासी विकास महामंडळाच्या लीना बनसोड, वीज मंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे , गोल्डी आनंद , नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा व सेक्रेटरी समीर रकटे उपस्थित होते.
यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद , रतन लथ , लीना बनसोड , एम व्ही पी चे सरचिटणीस नितीन ठाकरे, मेघना लथ , सुंदर लटपटे व एन डी सी ए चेअरमन विनोद शहा , गोल्डी आनंद , खेळाडूं तर्फे रसिका शिंदे यांची भाषणे झाली. सेक्रेटरी समीर रकटे यांनी आभार प्रदर्शन केले.
यावेळी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे इतर पदाधिकारी हेमंत देशपांडे , योगेश हिरे, विक्रांत मते, निखिल टिपरी, तरुण गुप्ता, NWPL समितीच्या शर्मिला साळी, पूनम शर्मा, विनोद यादव, पाचही फ्रँचायझी मालक, प्रशिक्षक व आयकॉन खेळाडू : सांगळे स्ट्राईकर्सचे – अनंत सांगळे - डॉ. भाविक मंकोडी - शाल्मली क्षत्रिय , दि रायजिंग स्टार्सचे – प्रिन्सी लांबा - भावना गवळी- ईश्वरी सावकार, मराठा वॉरिअर्सचे – वैभव पाटील - मंगेश गर्दे - रसिका शिंदे, जिजामाता स्क्वाडचे - एम व्ही पी चे नितीन ठाकरे - मंगेश शिरसाट -ज्ञानदा निकम , बालाजी सुपर नोव्हाजचे - कल्पेश भुतडा - मोहनीश मुळे- तेजस्विनी बाटवाल उपस्थित होते.