भोंदूबाबा अशोक खरातच्या आजच्या सुनावणीत काय घडलं ?
भोंदूबाबा अशोक खरातच्या आजच्या सुनावणीत काय घडलं ?
img
वैष्णवी सांगळे
महिलांचे शोषण आणि फसवणुकीच्या आरोपाखाली अटकेत असलेला भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. मागील सुनावणी प्रमाणेच सुरक्षेच्या कारणास्तव अशोक खरातला व्हिडीओ कॉनफरन्सद्वारे नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. या सुनावणीत न्यायालयाने अशोक खरातला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तसेच आरोपी अशोक खरातला उद्या पुन्हा न्यायालयात हजर करा, असे आदेशही न्यायाधीशांनी दिले.

आरोपी अशोक खरातला दुसऱ्या गुन्हात न्यायालयीन कोठडी मिळाल्याने आरोपीला सेंट्रल जेलमध्ये दाखल केले जाणार आहे. तिथून पुन्हा आरोपीचा एसआयटी ताबा घेणार अशी माहिती समोर येत आहे.अशोक खरातला मध्यवर्ती कारागृहात हजर करण्याची आणि पुन्हा त्याचा ताबा घेण्याची कायदेशीर प्रक्रिया आजच पूर्ण केली जाणार असल्याची माहिती आहे. 

आजच्या सुनावणीत काय घडलं? 
अशोक खरातला कोर्टात VC द्वारे हजर
न्यायमूर्ती श्रीमती बी इन ईचपुराणी यांच्या न्यायालयात सुनावणी
सरकारी वकील शैलेंद्र बागडे न्यायालयात हजर
आरोपीचे वकील सचिन भाटे न्यायालयात दाखल
अशोक खरात प्रकरणाचे तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशीही न्यायालयात दाखल

आरोपीला दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत देण्यात आली.
आता पुढील गुन्ह्यात आरोपीचा ताबा मिळावा यासाठी अर्ज केला जाणार आहे.
आरोपी अशोक खरातला उद्या पुन्हा न्यायालयात आरोपीला हजर करा, न्यायालयाचे आदेश

आरोपीला दुसऱ्या गुन्हात न्यायालयीन कोठडी मिळाल्याने आरोपीला सेंट्रल जेलमध्ये दाखल केले जाणार आहे. तिथून पुन्हा आरोपीचा ताबा SIT घेणार
अशोक खरातला मध्यवर्ती कारागृहात हजर करण्याची आणि पुन्हा त्याचा ताबा घेण्याची कायदेशीर प्रक्रिया आजच पूर्ण केली जाणार
इतर बातम्या
Join Whatsapp Group