मनपाच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांची बदली;
मनपाच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांची बदली; "यांची" झाली नियुक्ती
img
दैनिक भ्रमर

मुंबई : राज्य सरकारने आज 11 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले.

नाशिक मनपाच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अमित रंजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

अमित रंजन हे प्रकल्प अधिकारी, ITDP, पांढरकवडा आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, केळापूर उपविभाग, यवतमाळ येथे कार्यरत होते.

"या" ११ अधिकाऱ्यांची झाली बदली

१) राहुल रंजन महिवाल (आयएएस:आरआर:२००५), व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पुणे यांची महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे येथे सदस्य सचिव म्हणून बदली झाली आहे.
२) श्वेता सिंघल (आयएएस:आरआर:२००९) यांची महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे विशेष निवासी आयुक्त म्हणून बदली झाली आहे.
३) रुचेश जयवंशी (आयएएस:आरआर:२००९) यांची महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पुणे येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली झाली आहे.
४) कन्हूराज बागटे (आयएएस:एससीएस:२०११) यांची महावितरण, कल्याण येथे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली झाली आहे.
५) लक्ष्मण राऊत (आयएएस:एससीएस:२०१५), सचिव, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई यांची महाराष्ट्र राज्य खादी ग्राम उद्योग मंडळ, मुंबई येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली आहे.
६) गीतांजली बाविस्कर (आयएएस:एससीएस:२०१५), मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी ग्राम उद्योग मंडळ, मुंबई यांची सहसचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई येथे बदली झाली आहे.
७) डॉ. दिलीप जगदाळे (आयएएस:एससीएस:२०१५), सह व्यवस्थापकीय संचालक, महावितरण, कल्याण यांची सहसचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई येथे बदली झाली आहे.
८) पंकज देवरे (आयएएस:एससीएस:२०१६) यांची सचिव, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई येथे बदली झाली आहे.
९) मीनल करनवाल (IAS:RR:2019) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांची प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (POCRA), मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
१०) करिश्मा नायर (IAS:RR:2021) अतिरिक्त महापालिका आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
११) अमित रंजन (IAS:RR:2022) प्रकल्प अधिकारी, ITDP, पांढरकवडा आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, केळापूर उपविभाग, यवतमाळ यांची अतिरिक्त महापालिका आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group