अशोक खरात प्रकरणात नाशिकमधील डॉक्टरही पोलिसांच्या रडारवर,  महिलांना दिवस जाऊ नयेत म्हणून खरात...
अशोक खरात प्रकरणात नाशिकमधील डॉक्टरही पोलिसांच्या रडारवर, महिलांना दिवस जाऊ नयेत म्हणून खरात...
img
वैष्णवी सांगळे
नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याचा पोलीस कोठडीचा आज शेवटचा दिवस आहे. उद्या खरातची पोलीस कोठडी संपणार आहे. त्यामुळे उद्या कोर्टात नेण्यापूर्वी अशोक खरात याच्याविरोधात जास्तीत जास्त पुरावे गोळा करण्याचा एसआयटीचा प्रयत्न आहे. दरम्यान खरातची एसआयटीकडून सुरु असलेली चौकशी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. 



नाशिककरांनो पाणी जपूनच वापरा ! नाशिक शहरातील पाणी पुरवठा 'या' दोन्ही दिवशी बंद राहणार

एसआयटीच्या हाती एक महत्त्वाची माहिती लागली आहे. अशोक खरात याने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केले होते. मात्र, यापैकी एकही महिला गर्भवती झाली नव्हती. त्यासाठी अशोक खरात हा एखादे गर्भनिरोधक औषध वापरत असावा, असा दाट संशय पोलिसांना आहे.  या संशयामुळे अशोक खरात प्रकरणात पोलिसांकडून नाशिकमधील काही डॉक्टरांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूणच आता नाशिकमधील डॉक्टर पोलिसांच्या रडारवर असणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, महिलांना गर्भधारणा होऊ नये म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने अशोक खरात काही गोळ्या औषध देत होता का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. तसेच महिलांना संमोहित करण्यासाठीही अशोक खरात काही औषधांचा वापर करत होता का, याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. त्यामुळे एसआयटीकडून बुधवारी न्यायालयात एखादी गंभीर बाब समोर आणली जाण्याची शक्यता आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group