संपुर्ण नाशिक शहरात पाणी पुरवठा विषयक तसेच सिंहस्थ प्राधान्य विषयक मोठया स्वरुपाची महत्वाची व अत्यावश्यक कामे तसेच स्मार्ट सिटी मार्फत काही अत्यावशक कामे करण्यासाठी दोन दिवस शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
संपुर्ण नाशिक शहरात पाणी पुरवठा विषयक तसेच सिंहस्थ प्राधान्य विषयक मोठया स्वरुपाची महत्वाची व अत्यावश्यक कामे तसेच स्मार्ट सिटी मार्फत काही अत्यावशक कामे करण्यासाठी शनिवार दि. 4/4/2026 व रविवार दि. 5/4/2026 रोजी दोन दिवसांचा शट डाऊन घेण्याचे नियोजित असुन या कालावधीमध्ये विभागनिहाय खालीलप्रमाणे कामे करण्यात येणार असुन मक्तेदार व कामाचा कालावधी देण्यात आलेला आहे.
नाशिक पुर्व विभाग
1) नाशिक पुर्व प्र.क्र. 30 मधील कलानगर जलकुंभ भरणारी 500मी.मी. व्यासाची गुरुत्व वाहीनी मुख्य 700मी.मी. व्यासाच्या गुरुत्व वाहीनीला जोडणे, अंदाजे 24 तास
2) गांधी नगर जलशुध्दीकरण केंद्र
नाशिक पश्चिम विभाग
1) त्र्यंबक रोड एबीबी सर्कल येथे मोठया प्रमाणत असलेले 300 मी.मी. व्यासाच्या पाईपलाईन लिकेजचे काम बंद करणे
2) पी ॲन्ड टी कॉलनी येथे 200 मी.मी. व्यासाचा एअर व्हॉल बदलणे.
वरील सर्व कामे पूर्ण करण्यासाठी कालावधी अंदाजे 12 तास लागतील
नाशिकरोड विभाग
तसेच गांधीनगर व नाशिक रोड जलशुध्दीकरण केंद्राची कामे खालीलप्रमाणे
1) नाशिक रोड जलशुध्दीकरण केंद्र येथे रॉ वॉटर 900 मी.मी.एम लाईनचे क्रॉस कनेक्शन करणे.
2) गांधीनगर जलशुध्दीकरण येथे रॉ वॉटर 900 मी.मी.लाईन 1200 मी.मी. पाईपलाईनवर क्रॉस कनेक्शन करणे.
3) गांधीनगर जलकुंभाजवळ पंपाची इनलेट 700 मी.मी. व्यासाच्या पाईपलाईन वर 450 मी.मी. व्यासाच्या पाईपलाईनचे क्रॉस कनेक्शन करणे. तसेच सदर 700 मी.मी. व्यासाच्या पंपाच्या पाईपलाईनवर स्मार्ट सिटी मार्फत फ्लो मिटर बसविणे.
वरील सर्व कामे पूर्ण करण्यासाठी कालावधी अंदाजे 36 तास लागतील
पंचवटी विभाग
1) पेठरोड सप्तरंग बिल्डींगजवळ मखमलाबाद येथील उर्ध्ववाहीनीवर 600 मी.मी. X 600 मी.मी. व्यासाचेतवली डोंगर उर्ध्ववाहीनीचे क्रॉस कनेक्शन करणे.
2) पेठरोड आर.टी.ओ ऑफीससमोर समर्थ नगर नवीन जलकुंभाचे उर्ध्ववाहीनीचे करणे 600 मी.मी. X 00 मी.मी. व्यासाचे क्रॉस कनेक्शन
3) पंचवटी प्रभाग क्र. 06 कुसुमाग्रज गार्डन येथे गुरुत्ववाहिनीवरील लिकेज बंद करणे.
वरील सर्व कामे पूर्ण करण्यासाठी कालावधी अंदाजे 18 तास लागतील
सातपुर विभाग
1) सातपुर विभागातील 1200 मी.मी. व्यासाची पी.एस.सी. कडेपठार अनुविषांत अपार्टमेंट जवळ पाईपलाईन गळती बंद करणे.
2) सातपुर विभागातील महेंद्र मटेरीअल गेट समोर 1200 मी.मी. व्यासाची पी.एस.सी. पाईपलाईन गळती बंद करणे.
3) सातपुर विभागातील बळवंत नगर जलकुंभाजवळ ओमकार तिरुमाला बिल्डींग समोरील 1200 मी.मी. व्यासाची पी.एस.सी. पाईपलाईन गळती बंद करणे.
4) सातपुर विभागातील कॅनल लगत पाटील फार्म हाऊस समोर 1200 मी.मी. व्यासाची पी.एस.सी. पाईपलाईन गळती बंद करणे.
5) सातपुर विभागातील कार्बन नाका टपरी झोन जवळ भिंती लगत 500 मी.मी. व्यासाची पी.एस.सी. पाईपलाईन गळती बंद करणे.
वरील सर्व कामे पुर्ण करणेसाठी अंदाजे 12 तास लागतील.
नविन नाशिक विभाग
1) नविन नाशिक प्र.क्र.२७ महाराजा हॉटल येथील १००० मी.मी.पीएससी लाईन चे लीकेज बंद करणे.
2) नविन नाशिक प्र. क्र. २७ मधील पाथरडी फाटा वरील ३ नं टाकी वर आउटलेट वाल्व टाकणे
3) नविन नाशिक प्र. क्र. २५ मधील इंद्रनगरी जलकुंभ येथे क्रॉस कनेक्शन करून ४५० मी.मी. व्यासाचा वाल्व टाकणे.
4) नविन नाशिक प्र. क्र. २४ मधील लेखानगर स्टेट बँक च्या मागे टाकी भरण्याच्या साडेचारशे मी.मी. व्यासाची पाईपलाईन लिकेज काढणे.
5) नविन नाशिक प्र. क्र. २४ गोविंद नगर जॉगिंग ट्रॅक पी एस सी लाईनवरील लिकेज काढणे.
6) नविन नाशिक प्र. क्र. २४ गोविंद नगर बोगद्या जवळील 600 मी.मी. व्यासाची टाकी भरण्याची मेन पाईपलाईन लिकेज काढणे.
7) नविन नाशिक प्र. क्र. ३१ मधील भवानी माता -२ टाकी भरण्याची पाईपलाईन वरील लिकेज काढणे.
8) नविन नाशिक प्र. क्र. 25 मधील रायझिंग मेन लाईन व्हॉल दुरूस्ती करणे.
9) नविन नाशिक प्र क्र २७ मधील मारुती संकुल पम्प येथे एन आर वी वॉल्व चे लीकेज काढणे. वेळ -२४ तास. वरील सर्वे कामास अंदाजे १8 तास लागणार आहे .
15 वा वित्त आयोग
1) गंगापुर धरण ते बारा बंगला 1800मी.मी. व्यासाच्या पाईपलाईन टाकणे या कामाअंतर्गत 1200 मी.मी. व्यासाची दोन पी.एस.सी. पाईपलाईन ला एस.एस. पाईपलाईन Blue Ocean संत कबीर नगर येथे क्रॉसिग करणे.
2) गंगापुर डॅम हेडवर्कस येथे बी.पी.टी. च्या जुन्या व नविन 1700 मी.मी. व्यासाचे क्रॉस कनेक्शन करणे
वरील दोनही कामे पुर्ण करणेसाठी अंदाजे 48 तास लागतील.
सदर शट डाऊन मध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत वरील कामांबरोबरच कामे प्रस्तावित आहेत.
उपरोक्त कामे करणेकरिता अंदाजे 36 ते 48 तास पाणी पुरवठा बंद ठेवणे आवश्यक व क्रमप्राप्त असुन हे कामे शनिवार दि. 4/4/2026 व रविवार दि. 5/4/2026 रोजी रोजीच्या शट डाऊन दरम्यान करता येईल. तरी पाणी पुरवठा वितरण, यांत्रिकी विभाग व स्मार्ट सिटी या विभागांची कामे करणेकरीता शनिवार दि. 4/04/2026 व रविवार दि. 5/04/2026 रोजी रोजी संपुर्ण दिवस पाणी पुरवठा बंद ठेवणेबाबत व सोमवार दि. 6/4/2026 रोजी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे तरी शहरातील सर्व नागरीकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.