नाशिक : मनपाच्या नावे खोटा संदेश पसरवून धमकीचा प्रकार
नाशिक : मनपाच्या नावे खोटा संदेश पसरवून धमकीचा प्रकार
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- प्रलंबित पाणीपट्टी व घरपट्टीची बिले थकित असलेल्या नागरिकांमध्ये व्हॉट्सअ‍ॅपद्वारे खोटा संदेश पसरवून भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी एका अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की अनोळखी व्हॉट्सअ‍ॅपधारक वापरकर्ते याने महानगरपालिकेच्या अधिकृत लोगोचा वापर करून व्हॉट्सअ‍ॅपवरून इंग्रजी भाषेत शहरातील नागरिकांची प्रलंबित पाणीपट्टी व घरपट्टीची बिले भरलेली नसल्याने त्यांचे कनेक्शन खंडित करण्यात येईल, तसेच बिले अपडेट करण्यासाठी 6297019792 या हेल्पलाईन क्रमांकावर अंकित अग्रवाल यांच्याशी संपर्क करण्याचा धमकीवजा मेसेज नागरिकांमध्ये प्रसारित करून भीतीचे वातावरण तयार केले. 

संशयित दोन्ही व्हॉट्सअ‍ॅपधारकांनी नाशिक महानगरपालिकेची ओळख चोरून अधिकृत लोगोचा व्हॉट्सअ‍ॅपच्या डीपीवरून खोटा संदेश पोहोचविल्याप्रकरणी मनपाच्या वतीने प्रतिनिधी म्हणून फिर्यादी यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, त्यानुसार अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिसे करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group