नाशिक : फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीवर अत्याचार
नाशिक : फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीवर अत्याचार
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- एकमेकांसोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार करणार्‍या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी अनस जावेद शेख (वय 20, रा. फातिमा हाऊस, मोठा राजवाडा, जुने नाशिक) याने पिंपळगाव बहुला येथे आईसाहेब मिसळ, तसेच लॉजमधील रूममध्ये फिर्यादीसोबत उभे राहून काही फोटो काढले होते. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने पीडितेच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित करून अत्याचार केले. 

तसेच आरोपीने दोघांचे एकत्रित फोटो इन्स्टाग्रामवर ठेवून बदनामी केली. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अनस जावेदविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बटुळे करीत आहेत.


इतर बातम्या
Join Whatsapp Group