नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अडीच वर्षे अत्याचार, तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अडीच वर्षे अत्याचार, तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :-  लग्न करण्याचे आश्‍वासन देऊन तरुणीवर अडीच वर्षे लैंगिक अत्याचार करून लग्नास नकार देणार्‍या तरुणासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी तरुणी ही सिडकोतील पवननगर परिसरात राहते. आरोपी आशुतोष महेंद्रसिंग पाटील (रा. चाळीसगाव, जि. जळगाव) याने फिर्यादीशी ओळख निर्माण करून तिचे आई, वडील व नातेवाईकांचा विश्‍वास संपादन केला. लग्न करणार असल्याचे आश्‍वासन देऊन पीडितेसोबत लैंगिक संबंध प्रस्थापित केले.

मात्र पीडितेने लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपी आशुतोष पाटील याने “मी तुझ्यासोबत कधीच लग्न करू शकत नाही. यापूर्वी जे काही झाले, ते तू विसरून जा,” असे सांगितले. त्यानंतर पीडितेचे लैंगिक शोषण करून आरोपीचे वडील महेंद्रसिंग पाटील व त्याच्या बहिणीने पीडितेला शिवीगाळ करून धमकी दिली, तसेच शारीरिक व मानसिक छळ केला. हा प्रकार नोव्हेंबर 2023 पासून 30 मार्च 2026 पर्यंत सिडकोत घडला.

या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पलांडे करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group