२६ मार्च २०२६
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणातील पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत.
पोलिसांनी व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या सहा जणांविरुद्ध सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अशोक थोरात या भोंदू बाबा वर सरकार वाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्याचा तपास विशेष पत्रिका कडून सुरू आहे या दरम्यान असे निदर्शनास आले की गुन्ह्यातील पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात येत आहे.
सिडको आणि सातपूर वॉलमन या नावाच्या व्हाट्सअप ग्रुप वर 26 मार्च रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास सिद्धार्थ रामोशी याने आठ अश्लील व्हिडिओ प्रसारित केले होते त्यानंतर सिडको आणि सातपूर वॉलमन व्हाट्सअप ग्रुप वरील इतर एडमिन रमेश शेख राहुल पवार प्रवीण काटे राहुल हिवाळे साहिल सय्यद व इतर एडमिन यांनी दुसऱ्या व्हाट्सअप ग्रुप वर हे व्हिडिओ पाठवले.
त्यावरून या सहा जणांविरुद्ध सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
Copyright ©2026 Bhramar