मुख्यमंत्र्यांनी पांघरून मंत्रालय..., अशोक खरात प्रकरणावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया समोर
मुख्यमंत्र्यांनी पांघरून मंत्रालय..., अशोक खरात प्रकरणावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया समोर
img
वैष्णवी सांगळे
अशोक खरात प्रकरण सध्या राज्यात चांगेलच तापले आहे.अशोक खरातचे अनेक काळे कारनामे समोर आले आहेत. अशोक खरात यांचे अनेक राजकीय व्यक्तींशी चांगले संबंध होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात याबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.



उद्धव ठाकरे यांनी नुकताच घेतलेल्या पत्रकार परिषदेत भोंदूबाबा अशोख खरात प्रकरणावर वक्तव्य केले.  “आता या एपस्टिन फाईलवरून कुणाचं लक्षण उडू नये म्हणून राज्यात नवीन विषय सुरू होता कामा नये. आपल्याकडे कायदा आहे. त्याचं कठोरतेने पालन केलं पाहिजे. अनेक राजकीय नेत्यांचे फोटो आणि नावे येतात. याचा अर्थ तुम्हाला कळतोय ना. कर्तृत्व शून्य नेते हा मार्ग अवलंबत आहेत. भाकड आणि भोंदू नेते त्यांच्यात कर्तृत्व नाही, स्वकर्तृत्वाने काही करू शकत नाही तेच लोक अशा भोंदूबाबांच्या नादी लागलं आहे.”

महाविकास आघाडीच्या सरकारमध्येही या भोंदूबाबाला मदत झाली यासंदर्भातही उद्वव ठाकरेंनी भाष्य केलं. माझं काहीही म्हणणं नाही, तुम्ही सगळ्यांची चौकशी करा. कारण, पाणी कुठपर्यंत मुरलंय ते कळू द्या, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात भोंदू बाबाला पाणी देण्यासाठी केलेल्या मदतीवरूनही स्पष्टीकरण दिले. 

शेवटी उद्धव ठाकरे यांनी, “मुख्यमंत्र्यांनी पांघरून मंत्रालय काढलं पाहिजे. सर्वांच्या पापावर पांघरून घातलं जात आहे. ते खातं त्यांच्याकडे ठेवावं. या निमित्ताने गावाोगावी भोंदू बाबा असतील त्याकडे कोणत्याही पक्षाचा कोणताही नेता जात असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. अगदी ओम फट स्वाहावरही.”
इतर बातम्या
Join Whatsapp Group