इगतपुरी : दोघा भोंदू महिलांनी लुबाडले ५५ हजार रुपये, जादूटोण्याचा धाक दाखवून महिलेला दिली जिवे मारण्याची धमकी
इगतपुरी : दोघा भोंदू महिलांनी लुबाडले ५५ हजार रुपये, जादूटोण्याचा धाक दाखवून महिलेला दिली जिवे मारण्याची धमकी
img
चंद्रशेखर गोसावी
इगतपुरी (भ्रमर वार्ताहर) :- नातेवाईकांनी तुझ्यावर करणी केली असून तुला बाधा झाली आहे. तुला बरे करण्यासाठी पूजाविधी केली नाही तर तुझे बरेवाईट होईल. अशी भीती घालून पूजाविधीच्या नावाखाली इगतपुरी तालुक्यातील तळेगाव येथील 2 भोंदू महिलांनी 55 हजार रुपये उकळल्याची घटना घडली.



याबाबत माहिती अशी की, या दोन भोंदू महिलांनी पूजा करून आणि रत्न खडे देऊनही तब्येतीत कोणताच फरक पडला नसल्याने पिडीतेने पैसे फोन करून दोघींकडे मागितले असता दोघींनी फिर्यादी महिलेला शिवीगाळ करून मारून टाकण्याची धमकी दिली. तु कोणत्याही बाबाकडे जा तुला कोणीही निट करणार नाही, आमच्या नादी लागली तर तुझे पूर्ण शरीर सडवून टाकू, अशी धमकी फिर्यादी महिलेला देण्यात आली. याप्रकरणी पिडीता वंदना रवींद्र गोसावी (वय 40, रा. दत्तनगर, गिरणारे) यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात दोन भोंदू महिलांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

या फिर्यादीनुसार इगतपुरी पोलिसांनी तळेगाव येथील वैशाली किशोर बैरागी, रत्ना माळी (दोघीही रा. तळेगाव, ता. इगतपुरी) यांच्याविरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group