नाशिक :  अजय बागूलसह तिघांना हायकोर्टाकडून जामीन मंजूर
नाशिक : अजय बागूलसह तिघांना हायकोर्टाकडून जामीन मंजूर
img
वैष्णवी सांगळे
नाशिक शहरातील विसे मळा गोळीबार आणि अपहरण प्रकरणातील संशयितांना अखेर आज दिलासा मिळाला आहे. भाजप नेते सुनील बागूल यांचा पुतण्या अजय दिलीप बागूल याच्यासह अन्य दोन संशयितांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यामुळे आतापर्यंत एकूण चार संशयित कारागृहाबाहेर आले असून, उर्वरित संशयितांनी जामिनासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय ?
सचिन अरुण साळुंके (२८) या तरुणाच्या दिशेने रामवाडी ते गंगापूर रोड या मार्गावर २९ सप्टेंबरच्या पहाटे गोळीबार करण्यात आला होता. या गुन्ह्यात सरकारवाडा पोलिसांनी अजय बागूल, सचिन कुमावत आणि दीपक जाधव यांना अटक केली होती.

त्यापूर्वीच मामा उर्फ बाबासाहेब राजवाडे, सागर बागूल, गौरव बागूल, प्रेमकुमार काळे, वैभव उर्फ विकी काळे, अमोल पाटील आणि संदीप शेळके यांना देखील अटक केली होती. फेब्रुवारी महिन्यात संशयित सागर सुधाकर बागूल याला सर्वात आधी जामीन मंजूर झाला होता तर, आता अजय दिलीप बागूल, दीपक उर्फ पप्पू राजेंद्र जाधव आणि अमोल भास्कर पाटील यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group