साहिल पारख विषयीची
साहिल पारख विषयीची "ती" बातमी आहे खोटी
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) - नाशिकचा डावखुरा फटकेबाज फलंदाज साहिल पारख हा गंभीररित्या जखमी झाल्याची बातमी युट्युब व अन्य प्रसारमाध्यमांवर सातत्याने झळकत आहे मात्र ही न्यूज खोटी असल्याचे साहिलच्या कुटुंबीयांकडून व प्रशिक्षकांकडून सांगण्यात आले.

दिल्ली कॅपिटल संघाकडून आयपीएल साठी निवड झालेला नाशिकचा डावखुरा फलंदाज साहिल हा सुस्थितीत आहे. दिल्लीचा अन्य एक फलंदाज हा जखमी झाला असून त्याच्यासाठी ॲम्बुलन्स मागवण्यात आली होती. मात्र त्या खेळाडूच्या ऐवजी साहिल पारख याचेच नाव समोर येत होते.. 

दिल्ली कॅपिटलचा सराव हा दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सुरू होता. साहिलचे नाशिकचे प्रशिक्षक श्रीरंग कापसे व साहिलच्या कुटुंबियांनी तो सुखरूप असल्याचे सांगितले. साहिलच्या चाहत्यांनी काळजी करू नये असे आवाहनही करण्यात आले.
इतर बातम्या
उद्या

गंगापूर धरण

Join Whatsapp Group