5 सहकाऱ्यांकडून अनेक महिने लैंगिक अत्याचार; टीसीएस कंपनीतील महिलेचे सहकाऱ्यांवर आरोप
5 सहकाऱ्यांकडून अनेक महिने लैंगिक अत्याचार; टीसीएस कंपनीतील महिलेचे सहकाऱ्यांवर आरोप
img
दैनिक भ्रमर




बीपीओ युनिटमध्ये काम करणाऱ्या एका महिलेने आरोप केला की, तिच्या 5 सहकाऱ्यांनी अनेक महिने तिचा लैंगिक छळ केला आणि तिच्या अंगाला नको त्या ठिकाणी स्पर्श करायचे. त्यांनी तिच्या धर्माबद्दल अपमानजनक टिप्पणी केली. तिचा सहकारी आसिफ अन्सारी तिच्या मांडीवर हात ठेवायचा आणि एकदा तर त्याने तिला जबरदस्तीने मिठीदेखील मारली होती.

एका मासिकाने दिलेल्या वृत्तानुसार, त्या महिला कर्मचाऱ्याने तिच्या जबाबात म्हटले आहे, की दि. 20 जून 2025 रोजी ती टीसीएसमध्ये कामाला लागली. शाहरुख कुरेशी आणि इतर सहकाऱ्यांसोबत तिची ट्रेनिंग 24 जून रोजी सुरू झाली. तिने असा आरोप केला की, या काळात लोन डिपार्टमेंटमधील टीम लीडर रझा मेमन कोणतीही औपचारिक भूमिका नसतानाही वारंवार ट्रेनिंग रूममध्ये येऊन वैयक्तिक आणि अपमानजनक टिप्पणी करीत होता.

या महिलेने जबाबात असेही सांगितले, की रजा मेमन अनेकदा मला विचारायचा, “तुझा नवरा शहराबाहेर असल्याने तू एकटीच सगळं कसं सांभाळतेस? तुला भीती वाटत नाही का? तुला काहीही लागलं तर मी कधीही मदत करायला तयार आहे.” रझा आणि शाहरुख कुरेशी यांनी तिला विचारले, की हे तुझे लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे. रझाने तिला ‌‘प्लेअर' हे टोपणनाव दिले होते आणि त्याच नावाने तिला तो आवाज द्यायचा. तो मला म्हणायचा, “मी जर तुझा नवरा असतो, तर मी तुला कधीच एकटं सोडलं नसतं.” या काळात तो अगदी माझ्या जवळ उभा राहून बोलायचा.

या महिलेने तिचा सहकारी आसिफ अन्सारीवर देखील गंभीर आरोप केले. आसिफ वारंवार तिच्या अंगाला अयोग्यरीत्या स्पर्श करायचा. तिने सांगितले, की तो मुद्दाम माझ्या अंगाला स्पर्श करायचा आणि माझा हात धरण्याचा प्रयत्न करायचा. अनेकदा तो माझ्या मांडीवर किंवा खांद्यावर हात ठेवायचा. एकदा तर त्याने मला जबरदस्तीने मिठीही मारली होती. अन्सारीने तिला “मी तुला आवडत नाही का? मी तुझ्या नवऱ्यापेक्षा जास्त देखणा आहे. माझ्यासोबत बाहेर चल, काही झाले तरी कोणाला कळणार नाही,” असे बोलायचा.

तसेच, तिने आसिफ अन्सारीवर असा देखील आरोप केलाल की लंच टाईममध्ये तो माझ्या बाजूला येऊन बसायचा आणि म्हणायचा, “तुझ्या काही शारीरिक गरजा असतील, तर मी त्या पूर्ण करीन.” महिलेने तिच्या तक्रारीत इतरही अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्या महिलेने दावा केला आहे की अन्सारीने तिच्या धर्माला लक्ष्य केले होते आणि त्याने आक्षेपार्ह टिप्पणीदेखील केली होती.  

इतर बातम्या
Join Whatsapp Group