अनेकदा आपण डी-मार्ट मध्ये खरेदी करण्यासाठी जातो तिथे कॅश काउंटरला अनेक महिला असततात पण तुम्ही कधी विचार केला आहे का त्यांना किती पगार असतो.
जाणून घ्या डी-मार्ट मधिल या कॅश काउंटरवरील महिलांना किती पगार दिला जातो.
सध्या शहरांमध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात डी-मार्ट उभारण्यात आली आहेत. कारण महिलांना सर्व गोष्टी स्वस्त आणि एकाच ठिकाणी मिळण्याचे ठिकाण म्हणजे डी-मार्ट आहे.
त्यामुळे डी-मार्टमध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र, तुम्ही कधी विचार केला आहे का की डी-मार्टमध्ये काम करणाऱ्या महिलांना किती पगार असतो?
डी-मार्टमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा पगार त्यांच्या पदावर आणि अनुभवावर अवलंबून असतो.
हा पगार 12 हजार पासून ते 25 हजार रुपयांपर्यंत असतो.
ज्यामध्ये सेल्स असोसिएट / कॅशिअर वर असणाऱ्या महिलांना महिन्याला 12 ते 14 हजार पगार मिळतो.
तर स्टोअर स्टाफ / रिटेल असिस्टंट असणाऱ्या महिलांना 10 ते 14 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जातो.
डी-मार्टमध्ये सुपरवायझर / सेक्शन हेड महिलांना दर महिन्याला 18 ते 25 हजार रुपये पगार मिळतो.