खुटवडनगरला डंपरची अनेक गाड्यांना धडक; अपघातात महिलेचा मृत्यू
खुटवडनगरला डंपरची अनेक गाड्यांना धडक; अपघातात महिलेचा मृत्यू
img
दैनिक भ्रमर

खुटवड नगर परिसरात असलेल्या मधुर स्वीट जवळ एका डंपरने अनेक गाड्यांना धडक दिल्याची घटना घडली.

आज दुपारी १ ते १.१५ वाजे दरम्यान हा भीषण अपघात झाला. डंपरने दिलेल्या धडकेत चार चाकी तसेच दुचाकींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अपघातात एका दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू झाला. तिच्या शरीराचे अवयव देखील धडा वेगळे झाले. अंगावर शहारे आणणारा हा अपघात होता.

जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ह्या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास सुरू आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group