२८ एप्रिल २०२६
नाशिक शहरात ठिक-ठिकानी सिंहस्थ कुंभमेळ्याची कमे सुरू आहेत. या कामांमुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. मात्र त्यातच आता नाशिककरांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराच्या पाण्याच्या साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे. त्यामुळे नाशिककरांना कुंभमेळ्या पूर्वीच मोठा दिलासा मिळणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे सध्या सुरू आहेत.
कुंभमेळ्यानिमित्त जगभरातून करोडो भाविक नाशिक शहरामध्ये येणार आहेत. त्यामुळे सध्या नाशिक शहरामध्ये सिंहस्थापूर्वी भाविकांना आणि नागरिकांना कशापद्धतीने पाणी पुरवठ्याची उपलब्धता होणार, याचा प्रयत्न सध्या महानगरपालिकेकडून सध्या केला जात आहे.
नाशिक महानगर पालिकेच्या हद्दीमध्ये बहुप्रतिक्षित किकवी धरणाच्या कामाला गती मिळत आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आधीच या धरणामध्ये 1 टीएमसी पाण्याची साठवणूक केली जाणार आहे. त्यामुळे भाविकांना यामुळे मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
गेल्या महिन्यामध्ये केंद्रीय पर्यावरण आणि वन विभागाच्या अधिकार्यांच्या भेटीने हा प्रकल्प आता वर्षभरात सुरू करण्याच्या आणि सिंहस्था पूर्वी 1 टीएमसी पाण्याची साठवणूक करण्याचा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. केंद्रीय वन आणि पर्यावरण विभागाने परवानगी देताच त्याच जागेवर धरण पायाची उभारणी केली जाईल आणि येत्या पावसाळ्यात 1 टीएमसी पाणी साठेल. नाशिक शहराला केल्या जाणाऱ्या धरणाच्या पाणी पुरवठ्यामध्ये वाढ केली जाणार आहे. गाळ काढून आणि शक्य तिथे व्यवस्थित बांधकाम करून पाणी पुरवठा वाढवला जाणार आहे.
गंगापूर धरणाच्या वरच्या बाजूला पाण्याची पातळी वाढवण्यासाठी किकवी नदीवर 2.4 टीएमसीचे पाणी प्रकल्प उभारला जाणार आहे. अजून सरकारकडून प्रकल्पासाठी जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू झालेली नाही. लवकरच ती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. खरंतर, प्रकल्पाला मान्यता मिळाली असून अनेक वेगवेगळ्या कारणांवरून हा प्रकल्प सध्या स्थगित झालेला आहे.
त्यामुळे लवकरच या प्रकल्पाला सुरूवात केली जाणार आहे. शहराची वाढती लोकसंख्या पाहता त्या अनुषंगानेच हे धरण बांधले जाणार आहे. किकवी नदीवर धरण बांधले जाणार असल्यामुळे गोदावरी नदीमध्ये येणारा पूर सुद्धा नियंत्रणात येणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 1.50 मे. वॅट वीज निर्मिती केली जाणार आहे, यांसह अनेक फायदे आहेत.
Copyright ©2026 Bhramar