नाशिककरांनो लक्ष द्या! अंबडमधील 'हा' रस्ता ३ महिने बंद; वाहतुकीत मोठे बदल, पाहा पर्यायी मार्ग
नाशिककरांनो लक्ष द्या! अंबडमधील 'हा' रस्ता ३ महिने बंद; वाहतुकीत मोठे बदल, पाहा पर्यायी मार्ग
img
नितीशा कुलकर्णी





रस्त्यांच्या कामांमुळे नाशिकमधील वाहतुकीचे चित्र बदलणार आहे. विशेषतः अंबड औद्योगिक वसाहतीतील महत्त्वाच्या मार्गावर काँक्रिटीकरणाचे काम हाती घेतल्याने गरवारे ते एक्स्लो पॉईंट हा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. सुरक्षित प्रवास आणि गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने प्रवाशांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

नाशिक शहरातील सध्या अनेक प्रमुख रस्त्यांचे काम हाती घेण्यात आले आहेत. प्रमुख रस्त्यांचे काम करण्यासाठी शहरातील महत्त्वाच्या मार्गांवर बदल करण्यात येणार आहेत. यामुळे नाशिककरांच्या वाहतुकीमध्ये महत्त्वाचा बदल केला जाणार आहे. अंबड औद्योगिक वसाहतीतील गरवारे टी पॉईंट ते एक्स्लो पॉईंट या मार्गावर काँक्रिटीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. या रोड ऐवजी नागरिकांना दुसर्‍या पर्यायी मार्गाचा विचार करावा लागणार आहे. या कामासाठी वाहतूक मार्गामध्ये तीन महिन्यांसाठी बदल करण्यात येणार आहे.

नाशिकच्या वाहतूक पोलिसांनी मार्गामध्ये कशापद्धतीने बदल केलेला आहे, जाणून घेऊया... अंबड औद्योगिक वसाहतीतील गरवारे टी पॉईंट ते एक्स्लो पॉईंट या मार्गावर काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हे काम सुरू आहे. कामाची मुदत संपली तरीही काम अजूनही सुरू आहे.

30 एप्रिलपासून पुढचे तीन महिने पुन्हा वाहतूक मार्गामध्ये बदल केले जाणार आहे. त्यामुळे काम होईपर्यंत वाहतूकदारांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे. वाहतूक शाखेने केलेल्या बदलानुसार, कदाचित नाशिककरांना बराच त्रास सहन करावा लागू शकतो. वाहतूक दारांनी सूचनांचे पालन करत वाहतूक विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अंबड औद्योगिक वसाहतीतील गरवारे टी पॉईंट कडे जाणाऱ्या वाहनांना दुभाजकाच्या विरूद्ध बाजूच्या मार्गाने आणि विविध औद्योगिक कंपन्यांच्या मार्गाने वळवण्यात आले आहे. एक्स्लो पॉईंटकडून गरवारे टी पॉईंटकडे जाणारी वाहतूकही बंद करून ती पर्यायी मार्गाद्वारे वळवण्यात आली आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी हे बदल करण्यात येणार आहेत.

गरवारे टी पॉइंटकडून एक्स्लो पॉईंटकडे जाणाऱ्या मार्गाचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आला आहे. एक्स्लो पॉइंटकडून गरवारे टी पॉइंटकडे जाणाऱ्या मार्गावर गरवारे ते एक्स्लोकडे जाणारी वाहतूक वळविण्यात आली आहे. एक्स्लोकडून गरवारेकडे येणार्‍या सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात आला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group