नाशिककरांचा प्रवास आता अधिक 'स्मार्ट'; एसटीच्या ताफ्यात दाखल होणार २०० नव्या 'राजमाता जिजाऊ' बसेस!
नाशिककरांचा प्रवास आता अधिक 'स्मार्ट'; एसटीच्या ताफ्यात दाखल होणार २०० नव्या 'राजमाता जिजाऊ' बसेस!
img
नितीशा कुलकर्णी





परिवहन महामंडळ हे प्रवाश्यांसाठी सतत्याने नव नविन सोई-सुविधा घेवून येत आहे. महिलांना आर्धे भाडे, जेष्टांना मोफत प्रवास गावखेड्या प्रयंत आता महामंडळ पोहोचत आहे. यातच आता आणखी नविन बसची भर पडणार आहे. गावखेड्यामध्ये धावणाऱ्या एसटीच्या ताफ्यामध्ये आणखी एक आरामदायी सेवा पुरवणारी बस दाखल होणार आहे.


महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाने प्रवाशांना अधिक आरामदायी आणि सुरक्षित प्रवास देण्यासाठी बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर मुख्यमंत्र्यांनी काही बसेसचे उद्घाटन देखील केले होते. या बसेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धावणार आहेत. आता अशातच नाशिक जिल्ह्यासाठी राज्य सरकारने 200 बसेस देऊ केल्या आहेत. लवकरच या बसेस एसटीच्या ताफ्यामध्ये दाखल होणार आहेत. त्यामुळे आता नाशिककरांचा प्रवास आणखीनच आरामदायी,सुरक्षित व सुखकर सहोणार आहे.


या जिल्ह्याला मिळणार सर्वाधीक 'राजमाता जिजाऊ स्मार्ट बसेस'

एसटीच्या ताफ्यामध्ये, 'राजमाता जिजाऊ स्मार्ट बसेस' या 3000 बसेस लवकरच दाखल होणार आहेत. या बसेस महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना देण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिकच आरामदायी होणार आहे. एसटी महामंडळाच्या स्मार्ट बसेसच्या प्रकल्पातील 3000 बसेस पैकी नाशिक जिल्ह्याला सर्वाधिक बसेस मिळालेल्या आहेत. या 200 बसेस नाशिक जिल्ह्यातील एसटी मंडळाच्या ताफ्यात आल्यानंतर नाशिक विभागातील ग्रामीण आणि लांबपल्ल्याच्या मार्गावरील जुन्या बसगाड्यांची जागा या आधुनिक बसेस घेणार आहेत. त्यासोबतच नाशिकच्या रस्त्यावर सिटीलिंक बसेसही धावतील. त्यामुळे नाशिककरांचा प्रवास अधिकच सुखकर, आरामदायी आणि दर्जेदार होणार आहे. या बसमध्ये


56 आसन व्यवस्था असणार

या बसमध्ये 56 आसन व्यवस्थे बरोबरच  विशिष्ठ आसनरचना देखील असणार आहे. एकूण ५६ आसने असतील. सध्याच्या एसटी बसमध्ये अंदाजे ४० आसने आहेत, त्यामुळे या बसमध्ये १६ अतिरिक्त आसनांची सुविधा मिळणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ४ सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस प्रणाली, पॅनिक बटण, पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम आणि इलेक्ट्रॉनिक मार्गफलक बसवण्यात आले आहेत.


प्रवास सुरक्षित अन् आरामदायी प्रवास

या बस प्रामुख्याने शहरांदरम्यान शटल सेवेसाठी वापरण्यात येणार असून, जास्त गर्दीच्या मार्गांवर त्यांची धावपट्टी असेल. त्यामुळे प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे. सुरुवातीला या बस नागपूरमध्ये सुरू केल्या जाणार असून, पहिल्या टप्प्यात ५० बस सेवेत दाखल होतील.

इतर बातम्या
Join Whatsapp Group