२० एप्रिल २०२६
अक्षय्य तृतीयेनंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठा उलटफेर दिसून आला आहे. आदल्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव स्थिर होते, पण आता खरेदीदारांसाठी दिलासादायक बातमी आहे. प्रमुख शहरांमधील सोन्या-चांदीचे आजचे दर जाणून घेऊया.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेली अक्षय्य तृतीया काल होती, या दिवशी सोनं आवर्जून खरेदी केलं जातं. दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजारात बरीच खरेदी झाली, सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडलेले असूनही नागरिकांनी फूल ना फुलाची पाकळी म्हणून थोडेफार सोने खरेदी केले. मात्र आता अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्याच दिवशी, सोमवारी सराफा बाजारात मोठा उलटफेर दिसून आला. सोन्याची चमक थोडी फिकी पडल्याचे दिसत असून चांदीही कमकुवत झाली आहे.
एक दिवसाच्या स्थिरतेनंतर राजधानी दिल्लीमध्ये 24 व 22 कॅरेटचं सोनं प्रति 10 ग्रॅमसाठी 10 रुपयांनी स्वस्त झालं. आदल्या दिवशी सोन्याचे भाव स्थिर होते, आणि त्याच्या आदल्या दिवशी, 19 एप्रिल रोजी, 24-कॅरेट सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम 810 रुपयांनी, तर 22कॅरेट सोन्याच्या दरात 750 रुपयांनी वाढ झाली होती. आता, दिवसभराच्या स्थिरतेनंतर, दिल्लीत चांदी स्वस्त झाली असून, तिच्या प्रति किलोग्रॅम दरात 100 रुपयांची घट झाली आहे.
चांदीची घसरण
यापूर्वी, 17 एप्रिल रोजी एक किलो चांदी 50000 रुपयांनी स्वस्त झाली आणि त्यानंतर 18 एप्रिल रोजी ती 10,000 रुपयांनी महाग झाली. यानंतर, काल म्हणजेच 19 एप्रिल रोजी, अक्षय तृतीयेला, चांदीचा भाव स्थिर राहिला आणि आज दिल्लीत ती 100 रुपयांनी स्वस्त होऊन 2 लाख 75 हजार 900 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. इतर महत्त्वाच्या महानगरांबद्दल बोलायचे झाल्यास, मुंबई आणि कोलकाता येथेही चांदीचे तेच दर आहेत. मात्र, चेन्नईमध्ये चांदी महाग असून तिथे एक किलो चांदीचा भाव 2,79,900 रुपये आहे, म्हणजेच या चार महानगरांपैकी चेन्नईमध्ये चांदी सर्वात महाग आहे.पुढे कशी असेल सोन्या-चांदीची चाल ?
पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि प्रमुख देशांमधील आर्थिक आकडेवारीवरून बाजारातील तेजी कायम राहील की किंचित मंदावेल, हे ठरेल. 20 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या या आठवड्यात, व्यापारी कच्च्या तेलाच्या किमती आणि किरकोळ विक्री, गृहनिर्माण आकडेवारी व ग्राहक भावना यांसारख्या अमेरिकेच्या प्रमुख आकडेवारीवर विशेष बारकाईने लक्ष ठेवलं जाईल. याव्यतिरिक्त, अमेरिका आणि ब्रिटनमधील उत्पादन आणि सर्व्हिस सेक्टरमधील PMI आकडेवारीदेखील बाजाराची दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.
Copyright ©2026 Bhramar