नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- मावशीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यावरून झालेल्या भांडणामुळे रागाच्या भरात भावाने भावाचा चाकू भोसकून खून केल्याची घटना आडगाव शिवारात घडली.
याबाबत वैभव विजय वाकेकर (रा. सद्भावना पोलीस हौसिंग सोसायटी) यांनी आडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले, की काल (दि. 21) दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास फिर्यादीचा मावसभाऊ संदीप विजय गायकवाड व अरविंद विजय गायकवाड या दोघा भावांमध्ये मावशीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याच्या कारणातून भांडण झाले.
अरविंद गायकवाड याने या भांडणाचा राग मनात धरून किचन रूममध्ये असलेला चाकू घेऊन तो संदीपला दोन ठिकाणी भोसकले. त्यात गंभीर दुखापत झाल्याने संदीपचा मृत्यू झाला. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात आडगाव पोलीस ठाण्यात हल्लेखोर अरविंद गायकवाडविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निकम करीत आहेत.