२ मुलांच्या आईचं दुसऱ्यासोबत सूत जुळलं, वैतागलेल्या नवऱ्यानं मग...
२ मुलांच्या आईचं दुसऱ्यासोबत सूत जुळलं, वैतागलेल्या नवऱ्यानं मग...
img
वैष्णवी सांगळे
बीडमध्ये पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं आहे. पत्नी, तिचा बॉयफ्रेंड आणि सासूच्या मानसिक त्रासाला कंटाळून नवऱ्यानं साडीनं गळफास घेत आयुष्य संपवलंय. या प्रकरणी तिघांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बीडच्या केजमध्ये घडली असून घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

प्राथमिक माहितीनुसार, केज येथील रहिवासी आश्रुबा उर्फ उत्तम शिवाजी जाधव (वय 40) यांची पत्नी मनीषा हिचे मागील एक वर्षापासून मयूर पाटील देशमुख या अविवाहित तरुणाशी अनैतिक संबंध होते. मयूरने मनीषाला धारूर रोड परिसरात एक खोली भाड्याने घेऊन दिली होती. मनीषा आपल्या पतीला सोडून आपल्या दोन मुलांसह प्रियकर मयूरसोबत तिथे पती-पत्नीप्रमाणे राहत होती.

दरम्यान १९ जानेवारी रोजी उत्तम जाधव हा मनीषाच्या राहत्या घरी गेला तेव्हा मनीषासह मयूरने त्याला जातीवाचक शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. मनिषा आणि तिचा प्रियकर मयूर देशमुख पाटील यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत जाधव यांना तेथून हाकलून दिल्याचा आरोप आहे. पत्नीचे उघडपणे सुरू असलेले अनैतिक संबंध, सासू मंगल हिचा पाठिंबा आणि प्रियकराकडून झालेला अपमान यामुळे जाधव प्रचंड मानसिक तणावाखाली होते. याच त्रासाला कंटाळून त्यांनी आपल्या राहत्या घरी लोखंडी अँगलला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेनंतर मृतक आश्रुबा जाधव यांचे भाऊ युवराज जाधव यांनी केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी मयूर प्रताप पाटील देशमुख (प्रियकर), मनिषा जाधव (पत्नी) आणि मंगल भारत खाडे (सासू) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम हे करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group