अवघ्या १० वर्षीय मुलाची आत्महत्या,  कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगर
अवघ्या १० वर्षीय मुलाची आत्महत्या, कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगर
img
वैष्णवी सांगळे
'बाल पण देगा देवा मुंगी साखरेचा रवा' असं आपण कायम म्हणतो. का ? तर बालवयात तितकासा काही तणाव नसतो फक्त सरांनी दिलेला अभ्यास करायचा आणि मज्जा करायची. असं असतं. पण प्रत्येक वेळेस असं असतं का ? तर नाही कारण गेल्या काही वर्षांपासून या निरागस वयातच मुलांवर तणावाची जणू कुर्हाड चालवली जात आहे.  प्रत्येकावर नसली तरी अनेकांवर असते ज्याचे गंभीर परिणाम दिसायला लागले आहे. 

गडचिरोलीच्या आरमोरी तालुक्यातील कोजबी येथे अवघ्या चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. मृत मुलाचे नाव संस्कार विनोद कन्नाके आहे. संस्कारचे आई-वडील पोटाची खळगी भरण्यासाठी तेलंगणा राज्यात मिरची तोडण्याकरिता गेलेले होते. घरी कोणीही नसल्याने संस्कार एकटाच घरी होता. रविवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास १० वर्षीय संस्कारने राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलं. 
 
शाळेतून घरी आल्यानंतरच संस्काराने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे. या घटनेची माहिती आरमोरी पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोटच्या मुलाला लटकलेल्या अवस्थेत पाहून संस्कारांच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली.मात्र या मुलाने आत्महत्येला का कवटाळलं याचं कारण समोर आलेलं नाही. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group