पुण्यातून एक धक्कादायक अन तितकीच हृदयद्रावक घटना घडली आहे. बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका 23 वर्षीय ज्योती कृष्णकुमार मीना हीने मंगळवारी रात्री वसतिगृहातील एका खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ज्योती मूळ राजस्थानची होती. बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षात शिकत होती. ती महाविद्यालयाच्या वसतिगृहातमध्ये राहत होती.
धक्कादायक म्हणजे टोकाचं पाऊल उचलण्याआधी ज्योतीने तिच्या सर्व मैत्रिणींना पार्टी दिली. केक कापला , एकत्र जेवण केलं. त्यानंतर दुपारच्या सुमारास 4.30 वाजता तिने आईसोबतचा फोटो व्हॉटस्अॅप स्टेटसवरही ठेवला. सायंकाळी 6.30 नंतर ती कोणालाही दिसली नाही. मैत्रिणी तिला शोधू लागल्या, शोधाशोध केल्यानंतर ती अभ्यासासाठी राखीव असलेल्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. हे पाहून तिच्या मैत्रिणीला मोठा धक्का बसला. त्यांनी तात्काळ तिच्या कुटूंबीयांशी संपर्क साधला.
हे ही वाचा !
विद्यार्थिनीच्या सुसाईड नोटमध्ये काय?
मला शिकायचे आहे, पण माझ्याकडून होत नाहीये, मला माफ करा, असं म्हणत तिने आई-वडिलांना उद्देशून माफी मागणारा मजकूर शेवटच्या चिठ्ठीमध्ये लिहिलेला आहे. मृत तरूणीची मानसोपचार तज्ञांची ट्रीटमेंट सुरु होती, अशी माहिती मिळत आहे. विद्यार्थिनी आठवीत असल्यापासूनच मानसिक रुग्ण होती अशी माहिती देखील समोर येत आहे. आता या प्रकरणाचा अधिक तपास आता पोलिसांकडून सुरु आहे.