खळबळजनक ! बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारला, अन भावावर थेट...
खळबळजनक ! बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारला, अन भावावर थेट...
img
वैष्णवी सांगळे
तब्बल एक वर्षापासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला अखेर बारामती तालुका पोलिसांना  जेरबंद करण्यात यश आलं आहे. विद्या प्रतिष्ठान कॉलेज परिसरात मुलीची छेडछाड केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या भावावर लोखंडी कडं आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्लेनंतर आरोपी हा वर्षभर फरार होता

१५ जानेवारी रोजी घडलेल्या या संतापजनक घटनेत फिर्यादी आपल्या अल्पवयीन बहिणीची छेडछाड केल्याबाबत आरोपीला जाब विचारण्यासाठी विद्या प्रतिष्ठान कॉलेज परिसरात गेला होता. त्यावेळी आरोपींनी त्याला हातातील लोखंडी कडं आणि लोखंडी कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केलं होतं. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

या घटनेप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी गौरव दिलीप टेंगले (रा. म्हसोबाचीवाडी, पणधरे, ता. बारामती, जि. पुणे) हा गेल्या एक वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत फरार होता. मात्र गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि त्यांच्या टीमने गुप्त माहितीच्या आधारे १९ डिसेंबर रोजी एमआयडीसी परिसरातून आरोपीला अटक करत त्याच्या मुसक्या आवळल्या.


इतर बातम्या
Join Whatsapp Group