पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या बंडखोर उमेदवारासह, अधिकृत उमेदवारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. या उमेदवारांनी भाजपच्या अधिकृत उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड मधील निवासस्थानी हा पक्षप्रवेश संपन्न झाला.
पुणे महापालिका निवडणुकीत कोथरुड मतदार संघातील प्रभाग क्रमांक 9 आणि प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक 9 (ड) आणि (क)मधील शिवसेना उबाठा गटाचे बंडखोर उमेदवार महेश सुतार(ड), पूजा सुतार (क), नियोजन समितीचे सदस्य सुखदेव तापकीर आणि प्रभाग क्रमांक 11 (अ) गटाचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब धनवडे आणि विद्यार्थी सेनेचे अमर गायकवाड, माजी नगरसेवक पैलवान दिलीपदादा गायकवाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करुन भाजपा उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
या पक्ष प्रवेशावेळी भाजपचे प्रभाग क्रमांक 9 मधील भाजपचे उमेदवार लहू बालवडकर, गणेश कळमकर, रोहिणी चिमटे, प्रभाग क्रमांक 11 मधील भाजप उमेदवार अजय मारणे, अभिजीत राऊत, भाजपचे नेते डॉ. संदीप बुटाला, प्रकाशतात्या बालवडकर, प्रल्हाद सायकर, राहुल कोकाटे, शिवम बालवडकर यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.