माझे अपहरण नाही, त्याच्याशी प्रेमसंबंध, मी मर्जीने आले; भिगवणच्या अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट
माझे अपहरण नाही, त्याच्याशी प्रेमसंबंध, मी मर्जीने आले; भिगवणच्या अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट
img
वैष्णवी सांगळे
पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात एका मुलीचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली होती. लग्नाची खरेदी करण्यासाठी आपल्या आई आणि भावासोबत गेलेल्या तरूणीचं अपहरण करण्यात आल्याची चर्चा होती. विशेष म्हणजे, तरूणीच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यात तिखट टाकून दोन तरूणांनी तरुणीचं अपहरण केल्याचं सांगण्यात आलं. 

मात्र, याप्रकरणाला वेगळंच वळण मिळालं असून मुलीने स्वत: व्हिडिओ बनवून याबाबत माहिती दिली. माझ्या अपहरणाच्या बातम्या खोट्या असल्याचं देखील मुलीने स्पष्ट केले आहे.माझे संबंधित मुलासोबत प्रेमसंबध आहेत, मी माझ्या मर्जीने त्याच्यासोबत आल्याचं मुलीने व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्याने या घटनेत ट्विस्ट पाहायला मिळाला. 

माझे आणि मुलाचे गेल्या काही वर्षापासून प्रेमसंबंध आहे. माझे अपहरण झाल्याच्या बातम्या आहेत. परंतु माझे कुणीही अपहरण केले नाही. माझ्या डोळ्यात चटणी वगैरे टाकलेली नाही. मी माझ्या मर्जीने घरातून निघून आले आहे. राजकीय पुढाऱ्यांनी तसे आरोप केले. परंतु मी माझ्या मर्जीनेच मुलासोबत आलेली आहे, असे भिगवण प्रकरणातील मुलीने स्पष्ट केले.दरम्यान, मुलीकडून व्हिडिओ आल्यानंतर पोलीस दोघांचाही शोध घेत आहेत. मात्र, पोलिसांना अद्याप यश आले नाही. 

भिगवणच्या तरुणी तिच्या आई आणि भावासोबत दुचाकीवरून जात होती. यावेळी जहीर शेख आणि अयान शेख या दोन आरोपींनी त्यांची दुचाकी अडवली आणि तरूणीच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यात लाल तिखट टाकून अपहरण केलं. या घटनेनंतर भिगवण पोलीस ठाण्यासमोर हिंदू संघटनांची घोषणाबाजी केली हिंदू संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. हिंदू संघटनांनी पुणे-सोलापूर मार्ग अडवून महामार्गावर टायर पेटवले. या आरोपींना पकडण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलं होतं. तर आज भिगवण बंदची हाक देण्यात आलीय. दरम्यान माझे अपहरण झालेच नाही असे तरूणीने सांगितले आहे.
Pune | kidnap |
इतर बातम्या
Join Whatsapp Group