नववर्ष स्वागतापूर्वीच कुटुंबावर शोककळा, कार दुचाकीच्या अपघातात मायलेकाचा मृत्यू
नववर्ष स्वागतापूर्वीच कुटुंबावर शोककळा, कार दुचाकीच्या अपघातात मायलेकाचा मृत्यू
img
वैष्णवी सांगळे
येणाऱ्या वर्षाच्या स्वागतासाठी अवघ जग तयारी करत असताना पुण्यातील एका कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे. भोर - पुणे मार्गावर कार आणि दुचाकीची जोरात धडक झाली. या धडकेत दुचाकीवरील माय लेकांचा मृत्यू झाला आहे. 

प्राथमिक माहितीनुसार, नंदा लक्ष्मण धावले आणि अमृत लक्ष्मण धवले असं अपघातात मृत्यू झालेल्या आई आणि मुलाचं नाव आहे. अमृत धावले आणि त्याची आई नंदा धावले हे दोघेही पुण्यातील भोर तालुक्यातील तेलवडी गावात आपल्या कुटुंबियांसह राहतं होते. आज दुपारी २ वाजताच्या सुमारास दोघे मायलेक शेतात जाण्यासाठी निघाले.

अमृत आणि नंदा धवले हे दोघेही शेतात जात असताना भोर - पुणे मार्गावरील कासुर्डी गावाच्या हद्दीत समोर येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघाताचा मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आणि नंदा आणि त्यांचा मुलगा अमृत या दोघांनाही तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले.मात्र उपचारांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. 

धक्कादायक म्हणजे अपघातावेळी अपघात झालेल्या कारमधील चालक मध्यधुंद अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. याप्रकरणी भोरच्या राजगड पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group