तीन वाहनांचा भीषण अपघात, बारावीच्या ६ मुलांसह चालकाचा मृत्यू
तीन वाहनांचा भीषण अपघात, बारावीच्या ६ मुलांसह चालकाचा मृत्यू
img
वैष्णवी सांगळे
बंगळुरूमधील होसकोटेमध्ये भीषण अपघात झाला आहे. होस्कोट-दबासपेटे राष्ट्रीय महामार्गावर एम सत्यवारा गावाजवळ शुक्रवारी  भयंकर अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या कारने पाठीमागून दुचाकीला जोरात धडकली. अनियंत्रित झालेली कार कॅन्टरला जोरात धडकली. या तिहेरी अपघातात दुचाकी चालकासह ६ बारावीच्या विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला.

प्राथमिक माहितीनुसार, बारावीत शिकणारे ६ विद्यार्थी कारने लाँग ड्राईव्हसाठी रात्री घराबाहेर पडले होते. अभ्यासाच्या तणावातून बाहेर निघण्यासाठी सर्वजण फिरायला बाहेर पडले होते. पण होस्कोट राष्ट्रीय महामार्गावर एम सत्यवारा गावाजवळ आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले अन् कारने मागून दुचाकीला जोरात धडक दिली. कारचा वेग जास्त असल्याने ती कॅन्टरलाही जाऊन धडकली. या भीषण अपघातात बारावीच्या सहा मुलांचा आणि दुचाकी चालक गगन याचा मृत्यू झाला. अश्विन नायर,अरहान शरीफ, अयान अली, भरत, एथन जॉर्ज आणि फरहान यांचा मृतांमध्ये समावेश आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, होस्कोट-दबासपेटे राष्ट्रीय महामार्गावरील एम सत्यावरा गावाजवळ हा भयंकर तिहेरी अपघात झाला. होस्कोटहून देवनहल्लीकडे जाणारी XUV 700 कार (KA 03 NW 0138) आधी समोरील चुचाकीला जोरात धडकली. नंतर चालकाचे नियंत्रण सुटले आणि कॅन्टर वाहनाला धडक दिली. या अपघातात आणखी एक कारही धडकली. त्यामुळे दोन्ही कार, एक कॅन्टर आणि एक दुचाकी यांच्यात मोठी टक्कर झाली. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये ६ बारावीचे मुले असल्याचे समोर आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group