हृदयद्रावक ! कल्याण- नगर महामार्गावर भीषण अपघात ! 8 जणांचा जागीच मृत्यू
हृदयद्रावक ! कल्याण- नगर महामार्गावर भीषण अपघात ! 8 जणांचा जागीच मृत्यू
img
वैष्णवी सांगळे
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे.  या भीषण अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. एका ईको कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली ज्यात आठ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पुढे येत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार,  ईको कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकचा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांच्या धडकेनंतर ईको कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. सिमेंट मिक्सर आणि कारची समोरासमोर धडक झाल्याने कारमधील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. या भीषण धडकेत आठ जणांनी जागीच प्राण गमावले आहेत.

अपघाताचा आवाज होताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलीस प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या मृतदेहांना आणि जखमीला बाहेर काढले.या अपघातातील एकमेव गंभीर जखमी व्यक्तीला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group