देवदर्शनाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, 6 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
देवदर्शनाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, 6 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
img
वैष्णवी सांगळे
समृद्धी महामार्गावर अशोक खरातचे निकटवर्तीय आणि शिवनिका संस्थेचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, कर्नाटकातील यादगीर जिल्ह्यात खासगी ट्रॅव्हल्स आणि कारचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. खासगी आराम बस आणि कार एकमेकांवर आदळल्याने लागलेल्या आगीत सहा प्रवासी होरपळून मृत्यूमुखी पडले. यादगीर जिल्ह्यातील सुरपूर तालुक्यातील शांतगिरी क्रॉस येथे हा अपघात घडला. 



खासगी आरामदायी बस बंगळुरुहून कलबुर्गीला निघाली होती, तर कार विरुद्ध दिशेने येत होती. भरधाव कार खासगी आराम बसला येऊन धडकली असता बसने लगेच पेट घेतला.  या दुर्घटनेत  बसमधील सहा प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू  झाला आहे. तर, इतर प्रवाशांना आपला जीव वाचविण्यात यश मिळाले. या दुर्घटनेत अनेक प्रवासी देखील जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलला हलविण्यात आले आहे. 

बस आणि कार यांच्यातील अपघात आणि आगीचे वृत्त कळताच अग्निशमक दल पाण्याच्या गाडीसह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझवली. पण, तोपर्यंत बस आगीत जळून खास झाली होती. अपघातात होरपळून मृत्यूमुखी पडलेले सहा जण एकाच कुटुंबातील असून ते देव दर्शनावरून परत येत होते. कार ओव्हरटेक करताना हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group