नाशिक शहरात दोन अपघातांमध्ये दोन जण ठार
नाशिक शहरात दोन अपघातांमध्ये दोन जण ठार
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : शहर परिसरात वेगवेगळ्या अपघातांमध्ये एक महिला व एक पुरुष ठार झाल्याच्या नोंदी पोलीस ठाण्यांत करण्यात आल्या आहेत.

अपघाताचा पहिला प्रकार पाथर्डी गाव येथे घडला. फिर्यादी किरण पोपट गवळी (रा. गवळी मळा, पाथर्डी शिवार) यांची आई संगीता पोपट गवळी (वय 48) या दि. 16 सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास दाढेगाव रोडने रंगनाथ भुसारे यांच्या घराकडे पायी जात होते. त्यावेळी भरधाव आलेल्या एमएच 15 जेसी 5430 या क्रमांकाच्या छोटा हत्ती टेम्पोवरील चालकाने गवळी यांना धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे करीत आहेत.

अपघाताचा दुसरा प्रकार त्र्यंबक रोड येथे घडला. फिर्यादी संजय दशरथसिंग राजावत (रा. कोरडेनगर, गंगापूर रोड) यांचे वडील दशरथसिंग मनोहरसिंग राजावत (वय 71) हे एमएच 15 जीयू 5463 या क्रमांकाच्या स्कूटरने जात होते. त्यादरम्यान एमएच 15 एमएच 7845 या क्रमांकाच्या घंटागाडी डम्परच्या चालकाने स्कूटरला पाठीमागून ठोस मारली. त्यात फिर्यादीचे वडील रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाल्यामुळे ठार झाले. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबत पुढील तपास पोलीस हवालदार बनकर करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group