Nashik : डम्परच्या धडकेत 12 वर्षीय विद्यार्थीनीचा दुर्दैवी मृत्यू
Nashik : डम्परच्या धडकेत 12 वर्षीय विद्यार्थीनीचा दुर्दैवी मृत्यू
img
DB
नाशिक :- डम्परने दिलेल्या धडकेत एका 12 वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागापूर फाट्या जवळ घडली. 

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास सिद्धी मंगेश लूंबसे (वय 12) ही विद्यार्थिनी सायकलवरून क्लासला जात होती.   नागापूर फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला ती उभी असताना एक डम्पर भरधाव वेगात येत ती धडकली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. 



पोलिसांनी डम्पर चालकाला ताब्यात घेतले असून या प्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group