दैनिक भ्रमर - रस्ता अपघातांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. एकाच्या निष्काळजीपणामुळे इतरांना जीव गमवावा लागत आहे. आता भीषण अपघाताची बातमी पुण्यातून समोर आली आहे. पुणे - सोलापूर महामार्गावर यवतजवळ भीषण अपघात झाला आहे. यवतमध्ये एका कारने दुभाजक ओलांडून दुसऱ्या बाजूच्या दोन आलिशान गाड्यांना जोरात धडक दिली. या विचित्र अन् भयंकर अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ५ जण जखमी झाले आहेत.
तर जखमींवर उपचार सुरु आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. त्यानंतर मृतदेह पोस्टमार्टमासाठी पाठवण्यात आले. या अपघातातील मयतमध्ये उरुळी कांचन व यवत येथील दोघांचा समावेश आहे.यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर थोरबोले हे त्यांच्या जवळ असलेल्या चारचाकी गाडीतून सोलापूरच्या दिशेने निघाले होते.
हे ही वाचा...
यावेळी पुणे - सोलापूर महामार्गावरून राकेश भोसले हा सोलापूरच्या बाजूकडून पुण्याकडे निघाला होता. यावेळी त्याचे त्यांच्या गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडीने थेट दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या दोन चारचाकी गाड्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात अशोक थोरबोले व गणेश दोरगे या दोघांचा मृत्यू झाला. या घटनेत अधिक तपास पोलीस करत आहे.