कसाऱ्यात कारचा भीषण अपघात ! तिघांचा जागीच मृत्यू
कसाऱ्यात कारचा भीषण अपघात ! तिघांचा जागीच मृत्यू
img
वैष्णवी सांगळे
मुंबई नाशिक महामार्गावर एका कारचा भीषण अपघात झालाय. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी आहेत. मंगळवारी रात्री मुंबईहून नाशिकच्या दिशेने जात असताना कारवर काळाने घाला घातला.

मराठ्यांना आरक्षण मिळताच मनोज जरांगे ढसाढसा रडले, जीआर निघताच भावना अनावर

मिळालेल्या माहितीनुसार , मुंबई नाशिक महामार्गावर कार चालकाचं नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. शहापूर तालुक्यातील कसारा येथील ऑरेंज हॉटेलच्या समोर कारचा भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या जवळच्या सरकारी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

नाशिक : ठक्कर बाजार जवळ विधिसंघर्षित बालकाकडून एकाची हत्या

कसारा येथे अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. मृतदेह खर्डी येथील ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group